Press "Enter" to skip to content

मीच माझा रक्षक !

!! सायली देशपांडे !!

Covid-19 हा विषाणू अचानक आपल्या जीवनात आला आणि घड्याळाच्या काट्याबरोबर धावणार जग थांबले! Lockdown 1…2…3 वाढत आता चौथे सूरू झाले. प्रत्येकाला प्रश्न पडला आहे की आपले पुर्ववत आयुष्य कधी सुरू होईल? या प्रश्नाचे उत्तर शास्त्रज्ञांचा मते कधीच नाही असे आहे. किंवा या विषाणूवर जो पर्यंत खात्रीशिर लस वा औषध सापडत नाही तोपर्यंत असे आहे. त्यासाठी किती कालावधी लागणार हे अनिश्चित आहे व तोपर्यंत घरात थांबून राहणे हे देखील शक्य होईल असे वाटत नाही.
यासाठी घराबाहेर सोशल डिस्टंसिग पाळणे, मास्क वापरणे, खोकताना-शिन्कताना घ्यावयाची काळजी इ. नियमांचे पालन कटाक्षाने करण्यासह स्वतःची रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करणे आवश्यक आहे. यासाठी रोज सकाळी उठल्यावर गरम पाणी पिणे, तुळस, आले, लवंग, दालचिनी इ.चा पेय पदार्थांमध्ये जमेल तसा वापर करणे, समतोल आहार घेणे हे करावे. व बाहेरचे तयार पदार्थ, शितपेय, पॅक फूड, जंक फूड खाणं टाळावे. मैदा, साखर सुद्धा टाळावे.
आहार विहारासह रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी योग्य व्यायाम जसे योगासने, प्राणायाम, मेडीटेशन करणे, पुरेशी झोप घेणं याचा अंतर्भाव आपल्या जीवन शैलीत (Life Style) करावा लागेल. कारण ज्याची रोगप्रतिकार शक्ती कमी त्याची विषाणू संसर्गाची शक्यता जास्त हे तर निश्चित आहे. आणि जगातील कितीही श्रीमंत व्यक्ती स्वतःच्या आरोग्य संवर्धनाचे काम दुसर्याकडून करवून घेऊ शकत नाही. म्हणून फक्त मीच माझा रक्षक बनु शकतो!
स्वस्थ रहा….सुरक्षित रहा!

कोकण दर्पण

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »