पनवेल, कोकण दर्पण वृत्तसेवा : कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती वाढविणे अत्यावश्यक आहे. त्याअनुषंगाने आयुष मंत्रालय यांच्या निर्देशानुसार पनवेल महानगरपालिकेचे गटनेते परेश ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पनवेल महापालिकेतील खारघर प्रभाग क्रमांक सहाचे स्थानिक नगरसेवक निलेश बाविस्कर यांनी नागरिकांना अर्सेनिक अल्बम – ३० या होमिओपथीक औषधांचे वाटप केले.
कोरोना विषाणूचा संसर्ग सर्वत्र वाढत आहे. अद्यापि कोरोनाला रोखण्यासाठी औषध सापडले नाही. मानवी शरीरातील प्रतिकार शक्तीच कोरोनाला लांब ठेवू शकते. त्यामुळे आयुष मंत्रालय यांच्या निर्देशानुसार काेराेनाच्या पार्श्वभूमीवर रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय करिता अर्सेनिक अल्बम – ३० या होमिओपथीक औषध सूचित केले आहे. खारघर प्रभाग ६ मधील घरकुल आणि स्पगेटी सोसायटीत तसेच घरकुल-स्पगेटी येथील मार्केटमध्ये व्यवसाय करणाऱ्या दुकानदारांना अर्सेनिक अल्बम – ३० या होमिओपथीक औषधांचे वाटप केले.





