Press "Enter" to skip to content

महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त ‘अर्सेनिक अल्बम ३०’ औषधाचे वाटप !

पनवेल, कोकण दर्पण वृत्तसेवा : पनवेल महापालिकेचे सभागृह नेते व भाजपचे युवानेते परेश ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त स्थायी समितीचे सभापती प्रविण पाटील यांनी खारघर आणि खारघर गावात नागरिकांना ‘अर्सेनिक अल्बम ३०’ ह्या रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्याच्या औषधाचे वाटप केले.
सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, राजकारण, अशा विविध क्षेत्रात सातत्याने उल्लेखनीय कार्य करत आपल्या कार्याचा ठसा उमटविणारे पनवेल महानगरपालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांचा सोमवार रोजी वाढदिवस होता.
कोरोंनाच्या संसर्गामुळे पनवेल महापालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणात कोरोंनाचे रुग्ण सापडल्याने आणि ७ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. कामोठे आणि खारघरमध्ये रुग्णांचे प्रमाण जास्त आहे. कारण याठिकाणाहून अत्यावश्यक सेवेसाठी मुंबईला जाणार्‍यांचे प्रमाण जास्त आहे. त्यांच्या मार्फत या रोगाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात होत असल्याचे दिसून येत आहे.
नागरिकांनी या आजाराला घाबरू नये तर योग्य काळजी घेतल्यास कोरोंनावर मात केली जाऊ शकते. नागरिकांची प्रतिकारशक्ती वाढावी, यासाठी आयुष्य मंत्रालयातर्फे करण्यात आलेल्या आवाहनाचे व सूचनांचे पालन करीत पोलीस ठाणे, पेट्रोल पंप, स्वच्छतादूत तसेच नागरिकांना ‘अर्सेनिक अल्बम ३०’ ह्या रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याच्या औषधाचे वाटप करण्यात आले. फिजिकल डिस्टन्स नियमांचे पालन करून या औषधाचे वाटप सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी स्थायी समिती सभापती प्रविण पाटील, भाजपचे खारघर मंडल अध्यक्ष ब्रिजेश पटेल, नगरसेवक अभिमन्यू पाटील, रामजी बेरा, ऍड. नरेश ठाकूर, युवा नेते वासुदेव घरत, विनोद घरत, सचिन वास्कर, गीता चौधरी, सचिन वास्कर, विशाल नाईक, नितेश पाटील, शुभ पाटील उपस्थित होते.

कोकण दर्पण

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »