Press "Enter" to skip to content

कोरोनाच्या संकटात नगरसेविका सुरेखा नरबागे जनतेच्या पाठीशी ! लॉकडाऊनच्या काळात गरजूंना दिला मदतीचा हात !

नवी मुंबईत, कोकण दर्पण वृत्तसेवा : कोरोना विषाणूच्या भयंकर प्रादुर्भावामुळे नवी मुंबईवर कोसळलेल्या संकटाला दोन हात करण्यासाठी नवी मुंबई महापालिका प्रशासन मोठ्या शिताफीने लढत असताना सीबीडी -बेलापूर प्रभाग क्रमांक १०३ मधील स्थानिक नगरसेविका सुरेखा अशोक नरबागे यांनी आपल्या प्रभागाकडे विशेषत्वाने लक्ष दिले आहे. कोरोनाच्या संकटात नगरसेविका सुरेखा नरबागे आपल्या प्रभागातील सर्व समाजाच्या , जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या आहेत. आपली सामाजिक दायित्वाची भूमिका नगरसेविका सुरेखा नरबागे निभावताना दिसत आहेत.

सीबीडी -बेलापूर प्रभाग क्रमांक १०३ मध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी आपला प्रभाग निर्जंतुकीकरण करण्याची सुरेखा नरबागे यांनी विशेष खबरदारी घेतली. सॅनिटायझर फवारणी करून घरी रहा, सुरक्षित रहा , आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या अशा प्रकारे संदेश देऊन नागरिकांमध्ये जनजागृती केली. लॉकडाऊनच्या काळात आपल्या प्रभागातील गरीब व गरजूंना मदतीचा हात येण्यासाठी पुढे सरसावल्या. प्रभाग क्रमांक १०३ मध्ये सेक्टर ८ ए , ८ बी , ८ सी , माता रमाबाई आंबेडकर नगर , जय दुर्गामाता नगर , छत्रपती संभाजी नगर परिसर येतो. आपल्या प्रभागातील गरीब व गरजू कुटुंबाना घरोघरी जाऊन जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. जेष्ठ नेते साबू डॅनियल यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सामाजिक नेते अशोक नरबागे यांच्या नेतृत्वाखाली प्रभागातील गरीब व गरजूंना अन्नधान्य वाटप केल्याची माहिती नगरसेविका सुरेखा नरबागे यांनी दिली.

गरीब व गरजू कुटुंबाना घरोघरी जाऊन जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करताना
प्रभाग क्रमांक १०३ मधील स्थानिक नगरसेविका सुरेखा अशोक नरबागे

कोकण दर्पण.

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »