पनवेल, कोकण दर्पण वृत्तसेवा : कोरोना विषाणूचा वाढता पादुर्भाव लक्षात घेता गरीब गरजु व हातावर पोट असणाऱ्या नागरीक आणि त्यांच्या मुलांचे भुकेने हाल होऊ नये म्हणून १ मे महाराष्ट्र व कामगार दिना निमित्ताने खारघर विभागातील मुर्बी गावाजवळील झोपडपट्टीतील गरिब व गरजू नागरिकांना जीवनावश्यक वस्तूचे वाटप करण्यात आले. पनवेल विधानसभा आमदार प्रशांत ठाकुर यांच्या आदेशावरुन पनवेल महानगरपालिकेचे सभागृह गटनेते परेशदादा ठाकुर व पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांच्या सहकार्याने पनवेल महानगरपालिके तर्फे वाटप करण्यात आले. यावेळी पनवेल महापालिका माजी सभापती तथा खारघर प्रभाग ४ चे कार्यतत्पर नगरसेवक अभिमन्यु धर्मा पाटील, तालूका चिटणीस वासुदेव पाटील खारघर, तळोजा मंडळचे सरचिटणीस कीर्ती नवघरे, पनवेल महानगरपालिकेचे जयराम पादरी, वैभव पाटील, युवानेता नितेश अभिमन्यु पाटील, काशिनाथ घरत, गहीनाथ नावडेकर,अतुल पाटील, निकेश पाटील,नरेश पाटील,आकाश पाटील,प्रणय पाटील,मंगेश पाटील ,कुणाल पाटील,रुषिकेश म्हात्रे ,शनिवार म्हात्रे,रोहिदास कान्हा पाटील,काशीनाथ पाटील,रेवन पाटील,बाळाराम कडु , शंखुनाथ कडु ,राघो पाटील,बाळाराम पाटील,शेखर कोळी,राहुल पाटील ,मयूर घरत ,निरंजन पाटील, अनिकेत पाटील,मयूर पाटील सोमनाथ पाटील बँटी धाकसे राजेंदर सिंग कानावत आदि
मान्यवर उपस्थित होते.
कोकण दर्पण.





