पनवेल, कोकण दर्पण वृत्तसेवा : संपूर्ण जग कोरोना विषाणूंच्या महामारीने त्रस्त झाले. आपल्या देशावर देखील या विषाणू संकट आले आहे. महाराष्ट्र राज्यात कोरोनाने कहर माजविला आहे. अशा संकटकाळी परिस्थितीत आपली सामाजिक जबाबदारी पूर्ण करण्यासाठी पनवेल महानगर पालिकेच्या नगरसेविका संजना समीर कदम पुढे आल्या आल्या. आपल्या वाढदिवसानिमित्ताने संजना कदम यांनी सोसायट्याना सॅनिटायझरचे वाटप केले आणि आपल्या आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला दिला.
खारघर प्रभाग ६ मधील सेक्टर१५,१६,१७,१८ मध्ये काही सोसायटय़ांना ३० लिटर हॅण्ड सॅनिटायझरचे वाटप केले. सोसायटीच्या प्रत्येक गेटवरील सुरक्षारक्षकास सूचना करण्यात आल्या की सोसायटीच्या गेटमधून आपल्या घरी जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीस त्यांचे हात स्वच्छ (सेनेटाइज) करून जाण्यासाठी सांगावे व लोकांमध्ये जागृती करण्याच्या दृष्टीने असा प्रयत्न करण्यात आला आहे. दरवर्षी प्रमाणे आपल्या वाढदिवसाला नगरसेविका संजना समीर कदम या काहीतरी उपक्रम करीतच असतात परंतु या वर्षी तशी परिस्थिती नसल्याने इतर समाज उपयोगी कोणतेही कार्यक्रम राबविता आले नाहीत. सर्व लोकांना त्यांच्या माध्यमातून ‘घरीच रहा सुरक्षित रहा’ अशा पद्धतीचा संदेश देण्यात आला आहे.
वास्तुविहार के एच २ को ऑप हाऊसिंग सोसायटी,से १६ , वास्तू विहार के एच १ को ऑप हाऊसिंग सोसायटी से.१६ ,पारिजात को ऑप हाऊसिंग सोसायटी से.१६ ,संस्कृती को ऑप हाऊसिंग सोसायटी से.१६ ,उत्सव को ऑप हाऊसिंग सोसायटी ,से. १६ सेलिब्रेशन को ऑप हाऊसिंग सोसायटी से.१७ ,मोनार्च लक्झरीया को ऑप हाऊसिंग सोसायटी से.१८ , गिरीराज हाइट्स को ऑप हाऊसिंग सोसायटी से.१८ सुप्रीम टॉवर को ऑप हाऊसिंग सोसायटी से.१८ बालाजी रेसिडेन्सी को ऑप हाऊसिंग सोसायटी से.१५ ,जे के एल एम स्पाकेडी को ऑप हाऊसिंग सोसायटी से.१५ ,प्राइम रोज को ऑप हाऊसिंग सोसायटी से.१५ आदी सोसायट्यांमध्ये सॅनिटायझरचे वाटप केल्याची माहिती युवानेते समीर कदम यांनी दिली.

कोकण दर्पण





