Press "Enter" to skip to content

पार्थ पवार फाउंडेशनच्या वतीने अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना सॅनिटायझरचे वाटप !

पनवेल, कोकण दर्पण वृत्तसेवा : पार्थ पवार फाउंडेशनच्या वतीने मावळ लोकसभा मतदार संघातील पनवेल,उरण आणि कर्जत तालुक्यातील विविध विभागात अत्यावश्यक सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले.
पनवेल तालुक्यातील तळोजा विभागात कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी, एम एस ई बी विद्युत सेवा कर्मचारी, मोफत अन्नदान व धान्य वाटप सेवा आयेशा मस्जिद , कोरोना टेस्ट सॅम्पल कलेक्शन सेंटर खारघर एसआरएल लॅब ,सिडको पाणी पुरवठा विभाग, हॉस्पिटल येथील कर्मचाऱ्यांसाठी सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले. पनवेल शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सरचिटणीस प्रसाद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सदर वाटप करण्यात आले

खारघर विभागांमध्ये शाबास पटेल कृष्ण मर्ढेकर, कळंबोली विभागामध्ये संदीप म्हात्रे, चंद्रकांत राऊत , पनवेल ग्रामीण मध्ये दर्शन ठाकूर, खांदा कॉलनी व पनवेल येथे किशोर देवधेकर, प्रसाद पिंगळे, डॉ. जगनीत यांनी विशेष सहभाग घेतला. उरणमध्ये ११०० लिटर्स ,पनवेलमध्ये १२५०, कर्जत-खोपोलीमध्ये १६२५ लिटर्स ,पिंपीरीचिंचवड मध्ये २००० लिटर्स तर मावळमध्ये २७०० लिटर्स सॅनिटायझरचे वाटप जिल्हाध्यक्ष सतीश पाटील यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आल्याची माहिती प्रसाद पाटील यांनी दिली.

कोकण दर्पण

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »