कोव्हीड १९ युद्धात ग्लोबल अकॅडमीचे योगदान !
पनवेल, कोकण दर्पण वृत्तसेवा : ग्लोबल एव्हिएशन अकॅडमी खारघरचे चेअरमन सुरज म्हात्रे यांनी पनवेल महानगरपालिकेच्या वैद्यकिय विभागात काम करणा-या अधिकारी व कर्मचारी यांचेसाठी सुमारे तीन हजार सी व्हिटॅमिनच्या गोळ्या दिल्या. यावेळी स्थायी समिती सभापती प्रविण पाटील उपस्थित होते.
कोरोनाचे संकट रोखण्यासाठी पनवेल महानगरपालिका मोठ्या शर्थीने प्रयत्न करीत आहे. महापालिका आयुक्त गणेश देशमुख पनवेलच्या सुरक्षेसाठी लढत आहेत. पनवेल महापालिकेच्या माध्यमातून सुरक्षात्मक उपाययोजना आखात आहेत. कोरोनाच्या लढाईत नागरिकांनी जसे जमेल तसे पालिका प्रशासनाला महापौर फंडाद्वारे मदतीचे आवाहन केले आहे. अनेक संस्था वेवेगळ्या माध्यमातून मदतीसाठी पुढे आले आहेत. आज खारघर येथील ग्लोबल एव्हिएशन अकॅडमी खारघरचे चेअरमन सुरज म्हात्रे यांनी पनवेल महानगरपालिकेच्या वैद्यकिय विभागात काम करणा-या अधिकारी व कर्मचारी यांचेसाठी सुमारे तीन हजार सी व्हिटॅमिनच्या गोळ्या दिल्या. कोरोनाचे संकट रोखण्यासाठी वैधकीय कर्मचारी रस्त्यावर उतरून काम करीत आहेत, आपला जीव धोक्यात घालून आपले रक्षण करण्यासाठी पोलीस प्रशासन २४ -२४ तास सतर्क आहे. त्यामुळे त्यांचे स्वास्थ चांगले असणे गरजेचे आहे. त्यांची प्रतिकार क्षमता अधिक असेल तरच ते आपले कोरोनापासून संरक्षण करतील, या सामाजिक भावनेतून आज उपायुक्त जमीर लेंगरेकर यांच्या माध्यमातून सी व्हिटॅमिनच्या गोळ्या पनवेल महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांच्याकडे सुपूर्द केल्याची भावना चेअरमन सुरज म्हात्रे यांनी व्यक्त केली. खारघर पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्यांसाठी १ हजार सी व्हिटॅमिनच्या गोळ्या दिल्याचे सूरज म्हात्रे यांनी सांगितले.

कोकण दर्पण





