पनवेल, कोकण दर्पण वृत्तसेवा : भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश सचिव आर के दिवाकर यांनी खारघर नवी मुबंई येथे २००० गरीब, गरजू लोकांना अन्नदान करून आपला वाढदिवस साजरा केला.
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली आणि भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पुढाकाराने ‘मोदी भोजन’ कम्युनिटी किचनच्या माध्यमातून पनवेल महानगरपालिका क्षेत्रात दररोज हजारो गरजू लोकांना जेवण पुरविले जात आहे. खारघर सेक्टर १२ येथील शिव मंदिर जवळ दररोज अन्नदान केले जाते. मात्र , १ मे रोजी आपला वाढदिवस असल्याने आर के दिवाकर यांनी गरीब व गरजूंच्या अन्नदानाचा सर्व खर्च केला. दिवाकर यांच्या वतीने २००० लोकांना अन्नदान करण्यात आले.
कोरोना विषाणूच्या विरोधात लढण्यासाठी आज संपूर्ण देशात लॉक डाऊन सुरु आहे. त्यामुळे सामान्य जनता , मजूर आणि गरीब -गरजू जनतेचे मोठे हाल होत आहेत. जेवणाची मोठी अडचण होत आहे. पनवेल महापालिका प्रशासनाच्या आवाहनाला साथ देत अनेक ठिकाणी कम्युनिटी किचन सुरु करण्यात आले आहेत. लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली आणि भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पुढाकाराने ‘मोदी भोजन’ कम्युनिटी किचनच्या माध्यमातून पनवेलमध्ये अन्नदान केले जात आहे. वाढदिवसानिम्मित्ताने अन्नदान करण्याची मला संधी मिळाली, हाच खरा अर्थाने माझा वाढदिवस साजरा झाला, अशी भावना आर के दिवाकर यांनी व्यक्त केली.
यावेळी भाजप खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, भाजपचे ऍड राजेंद्र आगरवाल , मुकेश अग्रवाल तसेच अन्य पदाधिकारी , कार्यकर्ते उपस्थित होते.
कोकण दर्पण





