Press "Enter" to skip to content

लॉकडाऊनचा फटका : १६ लाख शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांवर उपासमार !

नवी मुंबई, कोकण दर्पण वृत्तसेवा : कोरोना संसर्गजन्य रोगावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी सरकारने अचानक लॉक डाऊन जाहीर केले.लॉक डाऊनमुळे शिष्यवृत्तीधारक विध्यार्थी वसतिगृह अचानक बंद करण्यात आली. त्यामुळे महाराष्ट्रातील १६ लाख पेक्षा जास्त अनुसूचित जाती , बौद्ध , ओबीसी , आणि आर्थिकदृष्टया दुर्बल सर्व समाज घटकातील विद्यार्थ्यांची उपासमारीची वेळ आली आहे. लॉक डाऊन काळात या विध्यार्थ्यांना त्यांच्या नातेवाईक आणि मित्रमंडळींकडे आसरा घेऊन राहावे लागत आहे . बहुतांश विध्यार्थी मुंबई, ठाणे , पुणे या कोरोनाने थैमान घातलेल्या जिल्ह्यांमध्ये जीव मुठीत घेऊन राहत आहेत. याबाबत दखल घेऊन योग्य कार्यवाही करावी, अशी मागणी सेक्युलर स्टुडेंट फेडरेशनने राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

भारत सरकारद्वारे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती , ओबीसी आणि आर्थिकदृष्टया दुर्बल समाज घटकाच्या विध्यार्थाना शिष्यवृत्ती देण्याची योजना आहे. भारतात या सर्व संवर्गाच्या सर्व प्रकारच्या कोर्स करणाऱ्या शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांची संख्या जवळपास एक कोटी पर्यंत आहे, असे सेकुयलर स्टुडन्ट फेडरेशनचे अध्यक्ष राजरत्न डोंगरगावकर यांनी सांगितले . या सर्व विद्यार्थ्यांची शैक्षणिक वर्ष २०१९ -२०२० ची शिष्यवृत्ती ३१ मार्च २०२० पर्यंत विध्यार्थ्यांच्या बँक खात्यात समाजकल्याण व आदिवासी विभागाच्या वतीने जमा करण्यात आलेली नाही. त्यांची शिष्यवृत्तीची रक्कम त्वरित विध्यार्थ्यांच्या बँक खात्यात व शिकवणी फी कॉलेज खात्यात जमा करून महाराष्ट्रातील १६ लाख पेक्षा जास्त अनुसूचित जाती , बौद्ध , ओबीसी , आणि आर्थिकदृष्टया दुर्बल सर्व समाज घटकातील विद्यार्थ्यांची उपासमार होणार नाही , यासाठी दखल घेऊन कार्यवाही करावी, अशी मागणी सेक्युलर स्टुडेंट फेडरेशनने राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

सदर योजना हि केंद्र सरकारची असल्यामुळे शैक्षणिक वर्ष २०१९-२० चा निधी केंद्र सरकारकडून राज्य सरकारकडे अवगत झाल्याचे फेडरेशनचे अध्यक्ष राजरत्न डोंगरगावकर यांनी सांगितले. केंद्र सरकारने आगाऊ रक्कम महाराष्ट्र सरकारला शिष्यवृत्तीसाठी देण्यात देण्यात यावी अशी मागणी फेडरेशनने केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांच्याकडे केली आहे. महाविद्यालयांच्या परीक्षांची वेळापत्रके शासनाने जाहीर करावे, त्यामुळे विध्यार्थ्यांना आपल्या वेळेचे व मुळगावकडे जाण्यासंदर्भात निश्चित करता येईल. तसेच मुंबई, पुणे , ठाणे येथे शिक्षणासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या विध्यार्थाना त्यांच्या मूळ जाण्यासाठी विशेष बस किंव्हा रेल्वेची सुविधा करावी, अशी विनंती फेडरेशनने मुख्यमंत्र्यांकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

कोकण दर्पण

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »