नवी मुंबई, कोकण दर्पण वृत्तसेवा : ह्रदय रुग्णांनी कोरोनाची धास्ती न घेता ह्रदयाची सुरु असलेली पूर्वीची औषधे नियमित घ्यावीत, असा सल्ला सुप्रसिद्ध जेष्ठ ह्रदयरोगतज्ञ तथा शुश्रूषा हार्टकेअर सेंटर अँड स्पेशालिटी हॉस्पिटलचे वैधकीय संचालक डॉ. संजय तारळेकर यांनी दिला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ह्रदयरोग असलेल्या व्यक्तींना मार्गदर्शन करण्यासाठी एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना डॉ संजय तारळेकर बोलत होते. कोरोनाच्या संकटात आपले मनोबल टिकवून ठेवले पाहिजे, हृदयावर ताण पडेल असा मानसिक तणाव घेऊ नये, असे देखील डॉ संजय तारळेकर यांनी नमूद केले आहे.
डॉ संजय तारळेकर पुढे म्हणाले, ज्या व्यक्तींना हृदयाचा विकार आहे, ज्यांच्यावर उपचार सुरु आहेत, ज्यांच्या शस्त्रक्रिया झाल्या आहेत , त्यांनी डॉक्टरांनी दिलेली औषधे वेळेवर आणि नित्याने घ्यायला पाहिजेत. ती कोणत्याही परिस्थितीत बंद करु नयेत असे आवाहन सुप्रसिद्ध जेष्ठ ह्रदयरोगतज्ञ तथा शुश्रूषा हार्टकेअर सेंटर अँड स्पेशालिटी हॉस्पिटलचे वैधकीय संचालक डॉ. संजय तारळेकर यांनी सह्याद्री वाहिनीवर आयोजित केलेल्या थेट प्रसारणप्रसंगी मुलाखतीत बोलताना केले.
डॉ तारळेकर म्हणाले, ह्रदयाच्या रुग्णांनी टीव्हीवर कोरोनाच्या बातम्या मर्यादित पाहाव्यात. सतत बातम्या पाहण्याने ह्रदयावर दडपण येते,व ह्रदयाचे ठोके वाढतात. कोणत्याही प्रकारचा तणाव ह्रदय रुग्णाने घेऊ नये. तणावामुळेही ह्रदयावरचे दडपण वाढते. ह्रदय रुग्णांनी आहारात भाजीपाल्याचा वापर जास्त करावा. वनस्पती तेल डालडा वापरलेले पदार्थ खाऊ नयेत. योग्य प्रकारे व्यायाम घरी करावा. लाँकडाऊन काळात ह्रदय रुग्णाला त्रास वाटल्यास त्याने त्वरीत ह्रदय रोगाची औषधे ज्या डॉक्टरांकडे सुरु आहेत, त्यांच्याशी संपर्क साधावा. त्यांनी दिलेली औषधे सुरु ठेवावीत.
कोरोना हा वटवाघूळ प्राण्यापासून निर्माण झालेला विषाणू आहे. यापूर्वी २००२ साली अशाच प्रकारचा विषाणू मांजरापासून तर २०१२ साली उंटापासून विषाणू निर्माण झाला होता. संसर्ग टाळणे हाच या रोगावरील रामबाण उपाय आहे. लाँकडाऊनमुळे संसर्ग टाळला जातो. जनताही त्यास चांगली साथ देत आहे. प्रत्येकाने आपल्या घरी राहून संसर्ग टाळल्यास कोरोना संपुष्टात येईल असे डॉ. तारळेकर म्हणाले.
कोकण दर्पण





