पनवेल, कोकण दर्पण वृत्तसेवा : पनवेल महानगरपालिका स्तरावर बेघरांसाठी भोजन समिती कार्यरत आहे. लाॅकडाऊन मध्ये आतापर्यंत शेकडो लोकांना समिती मार्फत जेवण व अन्नधान्य वाटप केले आहे. आजही अव्याहतपणे हे काम चालू आहे. परंतु मदतीचा ओघ अत्यंत कमी आहे. अनेक लोक बेरोजगार झालेत. ठिकठिकाणी अडकून पडले आहेत.आज सक्षम लोकांनी अशा गरजूंना मदत करावी, असे आवाहन पनवेल महापालिकेचे उपायुक्त जमीर लेंगरेकर यांनी केले आहे. अनेकांनी मदत केली आहे, परंतु ती मदत तोकडी पडत आहे. तेव्हा लाॅकडाऊनच्या उर्वरित काळासाठी आणखी मदतीची गरज आहे. सामाजिक संस्था, कंपन्या, दानशूर व्यक्ती, इत्यादींनी एक मूठ धान्य जरी गोळा केले तर शेकडो टन धान्य जमा होईल.असे देखील उपायुक्त जमीर लेंगरेकर म्हणाले.
पनवेल महानगरपालिकेच्या ९१३७८३५९३४ ,९१५२७८७७६७ ,९८५०७२५५८४ , ८०९७०४४८४४ या क्रमांकावर संपर्क करून आपण तांदूळ, डाळी (तूर,मसूर, मूग), खाद्यतेल, मसाले, आटा, कांदे, बटाटे इत्यादी जिन्नस आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात आणून देऊ शकता अथवा खालील व्यक्ती आपणाकडे येऊन जमा धान्य गोळा करतील. ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी आपल्या शेजारी रहात असलेल्या गरजू, गरीब व लाॅकडाऊनमुळे अडकून पडलेल्या नागरिकांना मानवी भूमिकेतून नक्कीच मदत करावी, असे आवाहन देखील तात्यांनी केले आहे.

कोकण दर्पण





