Press "Enter" to skip to content

महापौर सहाय्य्यता निधीसाठी योगदान द्या : उपायुक्त जमीर लेंगरेकर यांचे आवाहन !

पनवेल, कोकण दर्पण वृत्तसेवा : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी पनवेल महानगरपालिका शर्थीचे प्रयत्न करीत आले. मात्र , कोरोना विरोधातील लढाई जिंकण्यासाठी पनवेल महापालिका क्षेत्रातील नागरिकांनी पुढे येऊन महापौर सहाय्य्यता निधीसाठी मदत करावी , असे आव्हान पनवेल महापालिकेचे उपायुक्त जमीर लेंगरेकर यांनी केले आहे. आतापर्यंत ज्यांनी मदत केली त्यांना धन्यवाद देखील व्यक्त केले आहेत.
पनवेलमधील सुहासिनी रामदास शिवनेकर यांनी आपल्या ५१ व्य लग्नाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने महापौर सहाय्यता निधीत ५१००० /- रुपये आज चेकने दिले.
सुदाम पाटील, अभिजित पाटील व लतीफ शेख यांचे वतीने पनवेल महानगरपालिकेस आज आयुक्त गणेश देशमुख यांचेकडे भेट देण्यात आले.
पनवेल महानगरपालिका ही कोरोना संदर्भात उपलब्ध मनुष्यबळ व उपलब्ध तोकड्या यंत्रणेसह लढत आहे. सुदैवाने नागरिकही लाॅकडाऊनचे पालन करून सहकार्य करत आहेत.
महापौर सहाय्यता निधीत अनेक नागरिक पुढाकार घेऊन मदत करत आहेत. ज्यांना ज्यांना मदत करायची आहे त्यांनी महानगरपालिकेत संपर्क साधावा असे आवाहन उपायुक्त जमीर लेंगरेकर यांनी केले आहे.

कोकण दर्पण

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »