Press "Enter" to skip to content

शिवसेना जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांच्या पुढाकाराने कोरोना रुग्णांसाठी रक्तदान ! खारघरमधील गरजू -गरिबांना अन्नदान !

पनवेल, कोकण दर्पण वृत्तसेवा : कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन रायगड जिल्हा प्रमुख शिरीष घरत यांच्या मार्गदर्शनाखाली, शिवसेना पनवेल महानगर संघटिका ऍड शुभागी शेलार व
शिवसेना खांदा काॅलनी शहर शाखेच्या वतीने रोटरी क्लब (लिमये) ब्लड बॅकेत रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिरात रक्तदान करण्यासाठी रक्तदाते पुढे आले .अनेकांनी रक्तदान केले.
यावेळी शिबिरास सहभागी होताना, रायगड जिल्हाप्रमुख शिरीष घरत साहेब, महानगर प्रमुख श्री.रामदास शेवाळे साहेब,उपमहानगर प्रमुख श्री.दिपक घरत,युवासेना विधानसभा अधिकारी पराग मोहिते, ग्राहक संरक्षण कक्षाचे श्री.किरण तावदरे उपमहानगर प्रमूख श्री.लिलाधर भोईर,उपशहर प्रमुख दत्तात्रय महामुलकर,विभाग प्रमुख जयंत भगत, महीला शहर संघटीका सानिका मोरे,उप शहर संघटिका संचीता राणे, आस्मा खान, महीला विभाग संघटिका स्मिता घाडगे, शाखाप्रमुख सचिन धाडवे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

शिवसेना जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांच्या वतीने खारघर सेक्टर १९ मध्ये गरीब गरजू लोकांना जेवण वाटप करण्यात आले. त्यावेळी उपस्थित शिवसेनेचे उपमहानगर प्रमुख दिपक घरत, कळंबोली ग्राहक कक्ष शहरप्रमुख जमिल खान आदी पदाधिकारी उपस्थित होते.

कोकण दर्पण

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »