Press "Enter" to skip to content

नवी मुंबई, पनवेलकरांना दिलासा ! मंगळवारी नवीन रुग्ण नाही !

नवी मुंबई, कोकण दर्पण वृत्तसेवा : नवी मुंबई आणि पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना दिलासा देणारी बातमी आहे. सोमवारी आणि मंगळवारी दोन्ही महानगरपालिका क्षेत्रात एकही कोरोना पॉझिटिव्ह नवीन रुग्ण आढळून आला नाही .

लॉक डाउन काळात घरी रहा, सुरक्षित रहा, लॉक डाउन काळात नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन नवी मुंबई आणि पनवेल या दोन्ही महापालिका प्रशासनाने केले आहे.

नवी मुंबईतील कोरोना पॉझिटिव्हची संख्या आता २८ आहे. सोमवारी आणि मंगळवारी यात वाढ न झाल्याने नवी मुंबईकरांची धास्ती थोडी कमी झाली. पनवेल महानगरपालिका क्षेत्रात १६ रुग्ण आहेत. इथे देखील दोन्ही दिवस नवीन रुग्ण वाढला नाही. मात्र , पनवेल ग्रामीण भागात सोमवारी उशिरा चार रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्याने पनवेल तालुक्याची चिंता वाढली. पनवेल महापालिका आणि ग्रामीण विभागासह एकूण २० रुग्ण आहेत. मात्र, आज येथील परिस्थिती नियंत्रणात आहे.

कोरोना विरोधात लढा देण्यासाठी नवी मुंबई आणि पनवेल या दोन्ही महापालिका प्रशासनाने कम्बर कसली आहे. अधिकारी, पोलीस , डॉक्टर्स आणि वैधकीय कर्मचारी आलेल्या संकटाशी समर्पित होऊन लढत आहेत.

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »