Press "Enter" to skip to content

शहीद योगेश पाटील ट्रस्टद्वारे २०० कुटुंबाना आधार ! ५ दिवस पुरेल इतके दिले अन्नधान्य !

नवी मुंबई, कोकण दर्पण वृत्तसेवा : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या लॉकडाउन काळात गरीब आणि गरजू समाजाची उपासमारी होऊ नये म्हणून शहीद योगेश पाटील ट्रस्ट देखील पुढे सरसावली आहे. शहीद योगेश पाटील ट्रस्ट आणि शहीद योगेश पाटील पेट्रोल पंपाच्या वतीने नवी मुंबई , पनवेल आणि मुंबईतील २०० कुटुंबाना अन्नधान्य वाटप करण्यात आले. तब्ब्ल पाच दिवस पुरेल इतके आवश्यक सर्व रेशन देण्यात आले आहे.

देशात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. गोरगरीब जनतेची उपासमार होत आहे. सरकार त्यांचे परीने मदतीचा हात देत आहे. परंतु आपणही खारीचा वाटा उचलला पाहिजे या भावनेने शहीद योगेश पाटील ट्रस्ट आणि शहीद योगेश पाटील पेट्रोल पंपातर्फे तळोजा फेज १ व तळोजा पापडीचापाडा येथील गोरगरीब १०० कामगार कुटुंबाना शुक्रवारी प्रत्येकी ५०० रूपयांचे जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.

दोन्ही संस्थेच्या वतीने शनिवारी सदर उपक्रम मानखुर्द शिवाजीनगर येथे राबविण्यात आला . मानखुर्द शिवाजी नगर येथील १०० कुटुंबाना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. माजी पोलीस अधिकारी तथा शहीद योगेश पाटील यांचे पिताश्री शिवाजी पाटील यांच्या मार्गदर्शखाली ट्रस्टच्या व्यवस्थापकीय संचालिका सुनीता पाटील, संचालक नरेंद्र पाटील तसेच इतर सदस्यांनी अन्नधान्य वाटप मोहीम पूर्ण केली.

कोकण दर्पण

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »