पनवेल, कोकण दर्पण वृत्तसेवा : कोरोना रोगाचा संसर्ग होऊ नये म्हणून शासनाने लॉकडाऊन केला आहे. त्यामुळे हातावर पोट असल्लेल्यांच्या उदर्निवाची मोठी अडचण निर्माण झाली आहे. या परिस्थितीची जाणीव राखून पार्थ पवार फाउंडेशनच्या वतीने पनवेल तालुक्यातील विविध भागात गरीब व गरजूंना भोजनदान करण्यात आले.
पनवेल तालुका आणि शहरांमध्ये हा उपक्रम राबवला जात आहे. कळंबोली, पनवेल, तळोजा, खारघर याठिकाणी गरजूंना जेवण पोहोचवण्यासाठी कार्यकर्ते मेहनत घेत आहेत. या अगोदर पार्थ पवार फाउंडेशनच्या वतीने जनतेला मास्क वाटप करण्याचा उपक्रम राबविण्यात होता.
तळोजा विभागामध्ये प्रसाद पाटील, शाबास पटेल, निरंजन विश्वास, सचिन सोनावळे, मंगेश नेरुळकर हे कार्यकर्ते आणि त्यांचे सहकारी या उपक्रमांमध्ये पुढे येऊन काम करत आहेत. याच बरोबर विविध विभागांमध्ये तिथले स्थानिक कार्यकर्ते खारघर येथे कृष्णा मर्ढेकर, राहुल पाटील, कळंबोली येथे संदीप म्हात्रे, चंद्रकांत राऊत, खांदा कॉलनी येथे सुनील नाईक, किशोर देवलेकर हे कार्यकर्ते विविध विभागांमध्ये काम करत आहेत. पनवेल जिल्हाध्यक्ष सतीश पाटील यांच्या नेतृत्वाखाली सदर उपक्रम राबवण्यात येत आहे.
कोकण दर्पण.





