Press "Enter" to skip to content

नवी मुंबईत भाजपला आणखी धक्का ! ३ नगरसेवक शिवसेनेत दाखल ! सीबीडी- बेलापूरच्या विकासाठी शिवसेनेत प्रवेश – अशोक नरबागे

नवी मुंबई, कोकण दर्पण वृत्तसेवा : नवी मुबई भाजपला महाविकास आघाडीने आणखी एक जोरदार धक्का दिला आहे. भाजपचे तीन नगरसेवक आज शिवसेनेत दाखल झाले आहेत. त्यामुळे आगामी नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत गणेश नाईक यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
नगरसेविका सुरेखा नरबागे, नगरसेविका कविता आगोंडे आणि नगरसेवक भोलानाथ ठाकूर यांनी शिवसेनेचा मार्ग निवडला आहे. आज सुरेखा नारबागे यांचे पती अशोक नरबागे, कविता आगोंडे यांचे वडील चंद्रकांत आगोंडे आणि भोलानाथ ठाकूर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून घेतले. यावेळी एकनाथ शिंदे आणि विजय चौगले उपस्थित होते.
नगरसेविका सुरेखा नरबागे, नगरसेविका कविता आगोंडे आणि नगरसेवक भोलानाथ ठाकूर सोमवारी आपल्या नगरसेवक पदाचा राजीनामा देणार आहेत. नवी मुंबईतील राजकीय घडामोडीमुळे गणेश नाईक याची अडचण वाढली आहे.

चौकट :
सीबीडी -बेलापूर प्रभाग क्रमांक १०३ मधील सर्वांगीण विकासाठी महाविकास आघाडी असलेल्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला असल्याची प्रतिक्रिया अशोक नरबागे यांनी व्यक्त केली आहे. प्रभाग क्रमांक १०३ मध्ये अनेक प्रश प्रलंबित आहेत. नागरी विकासाची कामे महापालिकेच्या माध्यमातून होणार आहेतच , मात्र शासन पातळीवरील कामे प्रलंबित आहेत. झोपडपट्टी पुनर्वसनासारखे मोठे प्रश्न अनेक वर्षांपासून रखडले आहेत. माझ्या जनतेला न्याय देण्यासाठी मी शिवसेनेत प्रवेश केला असल्याचे अधिक नरबागे यांनी नमूद केले आहे.

कोकण दर्पण

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »