पनवेल, कोकण दर्पण वृत्तसेवा : महाराष्ट्र आणि अख्या भारत देशाचे आराध्य दैवत, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती उत्सवाची परंपरा खारघर येथील मराठा समाजाने कायम ठेवली आहे. मागील आठ वर्षांपासून खारघरमध्ये छत्रपती शिवरायांचा जल्लोष साजरा केला जातो. यावर्षी देखील मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात शिवरायांची जयंती साजरी करण्यात आली. हा जल्लोष माणुसकीचा, आपुलकीचा, सामाजिक एकात्मता वाढविणारा , सर्व समाजाला एकत्र आणणारा , महिलांना स्वातंत्र्य अन सर्वस्व अधिकार देणारा अन त्यांच्यात आत्मविश्वस वाढविणारा, तरुणांमध्ये नवचैतन्य भरणाराना अन त्यांच्यात जबाबदारीची जाणीव करून देणारा असा असतो. शिवरायांच्या ऐतिहासिक स्मृतींना उजाला देणारा असतो. मराठा समाजाच्या पुढाकाराने खारघर येथे संपन्न झालेल्या जयंती महोत्सवाने पुन्हा एकदा अखंड समाजाला एकत्र बांधणारा उत्सव म्हणून आपली मोहर उमटवली आहे.
सलग तीन दिवस विविध समाजपयोगी कार्यक्रमांच्या आयोजनाने शिवजयंती साजरी करण्यात आली .रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान आहे , जीवनदान आहे. याचे मोल समाजात आणखी वाढावे म्हणून आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराचे उदघाटन महाराष्ट्रीयन बिल्डर्स असोसिएशनचे अध्यक्ष मधु पाटील यांच्या हस्ते करण्यात केले. यावेळी ४५ रक्तदात्यांनी रक्तदान केले. खारघर समाज संस्थेचे ट्रस्टी अर्जुन गरड , दत्तात्रय भोसले व त्यांची पत्नी यांच्यासह संस्थेचे उपाध्यक्ष संजय कंधारे व ज्योती कंधारे या दाम्पत्यांनी एकाचवेळी रक्तदान करून एक नवा आदर्श निर्माण केला. नवी मुंबई ब्लड बँकेचे संचालक किशोर बडगुजर आणि निलेश पाटील उपस्थित होते. कल्पेश चव्हाण, मनोज सत्रे यांनी पुरुष रक्तदात्यांचे व्यवस्थापन पहिले तर वृषाली शेडगे , अलका कदम , राजेश्री कदम, विजया मोहिते यांनी महिला रक्तदात्यांनीचे व्यवस्थापन केले.
शिवजयंतीच्या पहिल्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज व त्यांचे रणधुरंधरत्व या विषयावर शिवव्याख्याते जयवंत पाटील यांचे उत्कर्ष हॉल खारघर येथे जाहीर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी त्यांनी शिवरायांचे युद्ध कौशल्य आणि गनिमीकावा याबद्दल उपस्थितांना सांगून सर्वाना मंत्रमुग्ध केले.अफजलखानाचा वध करताना शिवरायांनी दाखविलेले रणधुरंधरत्व पाटील यांनी यावेळी विशद केले.
खारघर येथे काढण्यात आलेल्या भव्य मिरवणुकीचे व्यवस्थापन संजय कंधारे , अर्जुन गरड , वृषाली शेडगे , अलका कदम , राजेश्री कदम, विजया मोहिते, संतोषी चव्हाण यांनी केले. मिरवणूक खारघर उत्कर्ष हॉल ते रायन इंटरनॅशनल स्कूल पर्यंत काढण्यात आली. शिवरायांचचे दर्शन घेऊन रायगडावरून आणलेल्या शिवज्योतीचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. सातारा मित्र मंडळ, शंभूराजे मित्र मंडळ व स्वराज्य मित्र मंडळ यांनी शिवज्योत आणली होती.
खारघर येथील मिरवणुकीला म्हाडाचे सभापती बाळासाहेब पाटील, विरोधीपक्षनेते प्रीतम म्हात्रे ,माजी उपमहापौर विक्रांत पाटील, सांगली वैभव बँकेचे अध्यक्ष पी आर पाटील, महाराष्ट्रीयन बिल्डर्स असोसिएशनचे अध्यक्ष मधु पाटील, बांधकाम व्यावसायिक डी एल पाटील, नगरसेविका लीना गरड , प्रवीण पाटील, माजी पोलीस अधिकारी शिवाजी पाटील, बळीराम नेटके, कमांडर कलावंत ,जसबीनदर सैनी, खारघर भाजप अध्यक्ष ब्रिजेश पटेल, शहाजी भोसले, किरण भोसले , चंद्रकांत पाटील. यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून मिरवणूकचा आरंभ झाला. रथातून शिवरायांच्या आकर्षक पुतळ्याची आकर्षक मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत सहभागी झालेले खारघर मधील ४० महिलांचे लेझीम पथक हे मिरवणुकीचे मुख्य वैशिष्टये होते. स्वाभिमान ढोलताशा पथक कोपरखैरणे गजराने संपूर्ण खारघर दुमदुमून गेले. मिरवणुकीदरम्यान , हॉलिवूड सेक्टर ११ चौक बळीराम नेटके यांनी तलवारबाजीचे प्रात्यक्षिक सादर केले. मिरवणुकीत सहभागी झाललेयासाठी अनेक ठिकाणी सामाजिक संस्थांनी अल्पोपहाराची व्यवस्था केली होती. मिरवणुकीत सर्व महिलांनी भगवे फेटे बांधले. खारघरवासियांचा सहभाग उल्लेखनीय होता.
शिवजयंतीनिमित्ताने महिलांसाठी संगीत खुर्ची , टिकली लावणे , थर्मोकोल बॉल स्ट्रॉने उचलणे आदी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. महिलांचे चार प्रकारचे खेळ आयोजित केले होते . पहिल्या तीन क्रमांकाना साड्या व अन्य बक्षिसांचे वाटप करण्यात आले. महिला स्पर्धेचे संयोजन वृषाली शेडगे, अलका कदम, राजेश्री कदम , विजया मोहिते यांनी केले.
खारघर मधील सालाबादप्रमाणे आयोजित केले जाणार छत्रपती शिवाजी महाराज जयंती महोत्सव यशस्वी करण्यासाठी मराठा समाज खारघर संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य बी ए पाटील, कार्याध्यक्ष कालिदास देशमुख, सचिव प्रताप पाटील, खजिनदार ज्ञानदेव नवले, उपाध्यक्ष संजय कंधारे , उपाध्यक्ष शशिकांत जाधव , उपाध्यक्ष अशोक गिरमकर ,उपाध्यक्ष अलका कदम, सहखजिनदार तानाजी जाधव , सहसचिव वृषाली शेडगे , सदस्य बाळासाहेब फडतरे , विश्वासराव घार्गे , दिलीप महाडिक, राजाराम वायचळ , अर्जुन गरड, शांताराम सुर्वे , डी वाय पाटील, मनोहर सत्रे , राजेंद्र कदम , राजेश्री कदम , सुनीता काळे , माधव शिंदे , विजया मोहिते यांनी विशेष मेहनत घेतली.




संकलन : संजना महाडिक , संपादक – कोकण दर्पण.
कोकण दर्पण





