Press "Enter" to skip to content

बारणे यांच्या खासदार जनतेच्या भेटीला कार्यक्रमास भरघोस प्रतिसाद ! जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांचे आयोजन !

पनवेल, कोकण दर्पण वृत्तसेवा : पनवेल विधानसभा क्षेत्रातील विविध समस्या जाणून घेण्यासाठी मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी सोमवारी खारघर येथे राबविलेल्या खासदार जनतेच्या भेटीला या उपक्रमास नागरिकांनी भरघोस प्रतिसाद दिला.
यावेळी बारणे यांनी महानगरपालिका, ग्रामपंचायत, सिडको, पोलिस ठाणे, तहसील कार्यालय, प्रांत कार्यालय ,वीज वितरण कंपनी व इतर शासकीय कार्यालया संबंधित समस्या जाणून घेतल्या. तसेच समस्याचे निराकरण व  त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी बहुसंख्येने नागरिक उपस्थित होते.
  नैना प्रकल्पग्रस्त, जेष्ठ नागरिकांच्या व नोकरदार वर्गाच्या समस्या,घरपट्टी मालमत्ता, व पाणी बिल समस्या,चर्मकार गटई स्टॉल व केबिनवर पनवेल महानगर पालिका तर्फे होणारी कारवाई थांबवणे , MIDC तळोजा जलवाहिनी मंजुरीबाबत,शेतकर्‍यांच्या वाढीव नुकसान भरपाई रक्कम तातडीने मिळणेबाबत, सिडको हद्दीतील गावांच्या विकास निधिबाबत,स्थानिक नागरिकांना  रोजगार मिळणेबाबत,शहरामध्ये अनुदानित महानगर पालिकेच्या शाळा , कॉलेज सुविधा मिळणेबाबत, या संदर्भात समस्यचे मांडण्यात आल्या . या यावेळी रायगड पनवेल उत्तर रायगडजिल्हा  संपर्कप्रमुख  दत्ताजी दळवी, रायगड जिल्हाप्रमुख  शिरीष घरत, रायगड जिल्हा सल्लागार बबनदादा पाटील , सल्लागार  रमेश गुडेकर,सल्लागार  शिरीष बुटाला, उपजिल्हाप्रमुख रामदास पाटील,तालुका संघटक  भरत पाटील,विधानसभा संघटक  दिपक निकम, महानगर प्रमुख रामदास शेवाळे, तालुका प्रमुख एकनाथ  म्हात्रे, रघुनाथ पाटील,उपमहानगर प्रमुख दिपक घरत, उपमहानगर संघटक गुरूंनाथ पाटील,उपजिल्हा संघटिका कल्पना पाटील ,विधानसभा संघटिका रेवती सकपाळ,उपतालूका संघटिका  सुनंदा पाटील,महानगर संघटिका अॅड. सौ. शुभांगी शेलार,  युवसेना उपजिल्हा अधिकारी  अवचित राऊत, शहर प्रमुख, पदाधिकारी, महिला आघाडी, युवसेना पदाधिकारी,सलंग्न संघटना पदाधिकारी, शिवसैनिक, आदि पदाधिकारी उपस्थित होते.    

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »