Press "Enter" to skip to content

भाजपचे सिडको कार्यालयावर हल्लाबोल आंदोलन !

पनवेल, कोकण दर्पण : खारघर मधील विविध प्रश्न तात्काळ सोडविण्यासाठी सोमवारी खारघर भाजपच्या वतीने खारघर येथील सिडको कार्यालयावर हल्लाबोल आंदोलन करण्यात आले. आदी समस्या सोडवा अन्यथा इथून हलणार नाही असा पावित्रा घेत भाजप पदाधिकाऱ्यांनी सिडको कार्यालयातच ठिय्या मांडला.

पावसाळानंतर मैदानातील, उधाणातील गवत कापणे काम , ड्रेनेज लाईन साफ करणे , पदपथावर तुटलेली झाकणे, दिवाबत्ती आदी प्रश्नाकडे सिडकोचे अधिकारी डोळेझाक करतात. झोपलेल्या प्रशासनाला जागे करण्यासाठी खारघर भाजपचा ताफा सिडको कार्यालयात शिरला आणि अधिकाऱ्यांना धारेवर धरले. यावेळी भाजप नेते तथा जेष्ठ नगरसेवक अभिमन्यू पाटील, सभापती प्रवीण पाटील, खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल,महिला अध्यक्षा अनिता पाटील, नगरसेवक नरेश ठाकूर, नगरसेविका आरती नवघरे , नगरसेविका हर्षदा उपाध्याय , नगरसेविका संजना कदम , गीता चौधरी ,बिना गोगारी , मोना अडवाणी ,भाजप नेते समीर कदम ,दीपक शिंदे , अजय माळी, राजेंद्र मांजरेकर, शत्रुघन काकडे आदी उपस्थित होते.

कोकण दर्पण

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »