पनवेल, कोकण दर्पण वृत्तसेवा : भारतीय जनता पार्टी खारघर मंडलाची कार्यकारिणी मंडल अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी जाहीर केली आहे.
भारतीय जनता पार्टीच्या संघटनात्मक निवडणूका पार पडल्या. त्यामध्ये बुथ अध्यक्ष पासून ते राष्ट्रीय अध्यक्षांची निवड नुकतीच करण्यात आली आहे. भाजपाच्या संघटनात्मक दॄष्टीने रायगड जिल्हयाचे दोन जिल्हे झाल्यावर खारघरला मंडलाचा दर्जा देण्यात आला असून मंडल अध्यक्ष म्हणून ब्रिजेश पटेल यांची निवड करण्यात आली. जिल्हाध्यक्ष आ. प्रशांतजी ठाकूर यांच्या मान्यतेने ब्रिजेश पटेल यांनी त्यांच्या कार्यकारिणीची घोषणा केली. त्यामध्ये मंडल उपाध्यक्षपदी निर्दोष केणी, रमेश खड़कर, संजय घरत, बिना गोगरी, निशा सिंग , मंडल सरचिटणीस म्हणून किर्ती नवघरे व दीपक शिंदे, मंडल चिटणीस पदी साजिद पटेल, गुरुनाथ ठाकुर, सोमनाथ म्हात्रे, अनिता जाधव, मिरा घुगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
महिला मोर्चा अध्यक्षपदी वनिता पाटिल, युवा मोर्चा अध्यक्षपदी विनोद घरत, ओ. बी. सी. मोर्चा अध्यक्षपदी सुरेश ठाकुर, अनुसूचित जाती मोर्चा अध्यक्षपदी अनिल साबणे, उत्तर भारतीय प्रकोष्ठ संयोजकपदी विनोद ठाकुर, दक्षिण भारतीय सेल संयोजकपदी रविंद्रन नायर, व्यापारी सेल संयोजकपदी अंबालाल पटेल, भटके- विमुक्त आघाडी संयोजकपदी विलास राठोड, वैद्यकीय सेल संयोजकपदी किरण पाटिल,
माजी सैनिक सेल संयोजकपदी गजेसिंग शेरॉन, ट्रान्सपोर्ट सेल संयोजकपदी नरेंद्र रेड्डी, सांस्कृतिक सेल संयोजकपदी उमेश चौधरी, सहकार सेल संयोजकपदी रविंद्र श्रीवास्तव, विधि सेल संयोजकपदी अॅड. राजेंद्र अग्रवाल तर प्रभाग ४ अध्यक्षपदी वासुदेव पाटील, प्रभाग ५ अध्यक्षपदी रवींद्र काकडे व प्रभाग ६ अध्यक्षपदी
विलास निकम यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे.
सर्व नवनियुक्त पदाधिकारी पक्षाचं संघटन अधिकाधिक मजबूत करतील असा विश्वास मंडल अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी व्यक्त केला.

कोकण दर्पण
.





