एमआयएम नवी मुंबई महापालिका निवडणुकीच्या मैदानात !
नवी मुंबई, कोकण दर्पण वृत्तसेवा : नवी मुंबई महानगरपालिका लढण्यासाठी निवडणुकीच्या मैदानात उतरण्याचा निर्धार एमआयएमने केला आहे. महापालिकेच्या ओबीसी, एससी एसटी, महिला आरक्षित प्रभागांवर एमआयएमने आपले लक्ष केंद्रित केले आहे.
नवी मुंबई महापालिका निवडणुका एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात होणार आहेत. सर्वच राजकीय पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. भाजप आणि महाविकास आघाडीची जोरदार टक्कर होणार असल्याचे चित्र स्पष्ट असताना इतर पक्ष देखील ताक्तीनिशी मैदान उतरण्याची तयारी करीत आहेत. एमआयएमने देखील जोरदार तयारी केली असून प्रभागांची चाचपणी करीत आहे.
एमआयएम स्टुडेंट विंगचे महाराष्ट्र अध्यक्ष कुणाल खरात हे नवी मुंबई निवडणूक समन्वयक म्हणून काम करणार असल्याची माहिती एमआयएम स्टुडेंट विंगचे कोकण निरीक्षक शाहनवाज खान यांनी दिली.
कोकण दर्पण





