जुन्या प्रकल्पांना नवा मुलामा !
सायन्स पार्क , उड्डाण पूल, क्रीड़ा संकुल , ग्रंथालय,
सायकल ट्रॅक प्रकल्पांचा विकास करणार !
प्रतिनिधि, नवी मुंबई : ३८५० कोटी रूपये जमेचा आणि ३८४८ कोटी ९१ लाख रूपये खर्चासह एक कोटी नऊ लाख रूपये शिलकेचा नवी मुंबई महानगरपालिकेचा २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी मंगळवारी स्थायी समितीला सादर केला. यंदाच्या बजेटमध्ये २०१९-२० आर्थिक वर्षातील तब्बल १२१७ कोटी ७६ लाख रूपये शिल्लक राहिलेल्या रक्कमेचा समावेश आहे.
देशातील तिसऱ्या क्रमांकाची आणि श्रीमंत महापालिका म्हणून मिरवणाऱ्या नवी मुंबई महापालिकेच्या यंदाच्या बजेटमध्ये काही विशेष नावीन्य दिसले नाही. मागील वर्षीच्या बजेटमधील तब्बल बाराशे कोटी रूपये खर्च करण्याची नामुश्कि ओढवलेल्या महापालिकेने शिक्षण आणि आरोग्यसारख्या महत्वपूर्ण बाबींसाठी एकूण बजेटमधील ८ टक्के म्हणजे फक्त ३१९ कोटी रुपयांची तरतूद केलि आहे.
महापालिकेच्या ५३ प्राथमिक शाळांमध्ये ३६ हजार ६२७ विद्यार्थी शिकतात. १९ माध्यमिक शाळांमध्ये ५ हजार १५० विद्यार्थी शिकतात तर पालिकेने सुरु केलेल्या दोन सीबीएससी शाळांमध्ये १२७२ विद्यार्थी शिकतात. महापालिकेच्या हॉस्पिटलमध्ये अनेक सामान्य रुग्ण येतात. होस्पिटलच्या चांगल्या इमारती आहेत, मात्र इमरजंसी सेवा नाही, तदन्या डॉक्टर नाहीत, स्पेशलिटी डॉक्टटस नाहीत .पालिकेने याकडे गंभीरपणे लक्ष देने गरजेचे अस्ताना शिक्षण आणि आरोग्यासाठी किमान तरतूद केलि आहे. आरोग्य आणि शिक्षणासाठी जास्तीत जस्ट तरतूद करण्याच्या शासनाच्या सुचनेकदे पालिकेने कानाडोला केला आहे.
नेरुळ येथील सायन्स पार्क आणि घणसोली येथील क्रीड़ा संकुलाच्या नवीन घोषनेशिवाय नवीन प्रकल्प दिसत नाहीत. अनेक वर्षांपासून बजेटमध्ये दिसणाऱ्या जुन्याच प्रकल्पांना नवा मुलामा देण्याचा घाट महापालिकेने केला आहे.
महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी मंगळवारी झालेल्या स्थायी समितिच्या बैठकीत सभापती नवीन गवते यांच्याकडे महापालिकेचा बजेट सुपुर्द केला. महापालिकेच्या बजेटवर २५ व २६ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या सतायी समितीच्या बैठकीत चर्चा होऊन अंतिम मंज़ूरीसाठी महासभेमध्ये पाठवले जाईल.
महापालिका अर्थसंकल्पात जमेच्या बाजुमध्ये मिळणाऱ्या उत्पन्नामाध्ये स्थानिक संस्थेकडून मिळणारा कर १२५० कोटी रूपये, मालमत्ता कर ६३० कोटी रूपये, विकास शुल्क १२५० कोटी रूपये, पाणी पट्टी ११५ कोटी ५९ लाख रूपये, परवाना व जाहिरात शुल्क १० कोटी ७ लाख रूपये, अतिक्रमण शुल्क ४ कोटी १० लाख रूपये, मोरबे धरण व मलनिःसारण ३५ कोटी ६७ लाख रूपये, रस्ते खोदाई शुल्क २७ कोटी १५ लाख रूपये, केंद्र व राज्य शासन पुरस्कृत योजना १६० कोटी ५६ लाख रूपये, संकीर्ण जमा २६३ कोटी ९७ लाख रूपये, आणि मागील शिल्लक १२१७ कोटी ७६ लाख रुपयांचा समावेश आहे. तर खर्चाच्या बाबींमध्ये नागरी सुविधा ९८७ कोटी ११ लाख रूपये , प्रशासकीय सेवा ६३८ कोटी ६९ लाख रूपये, पाणी पुरवठा व मलनिःसारण ५८० कोटी ९१ लाख रूपये, इत्र नगरी सुविधा ३८९ कोटी ७२ लाख रूपये, ई गव्हर्नस २२ कोटी ६५ लाख रूपये, सामाजिक विकास ४३ कोटी ७२ लाख रूपये, स्वच्छ महाराष्ट्र व घनकचरा व्यवस्थापन , डम्पिंग ग्राउंड ४२९ कोटी १५ लाख रूपये, केंद्र व राज्य पुरस्कृत योजना ९० कोटी १८ लाख रूपये आरोग्य सेवा ११६ कोटी ६० लाख रूपये, परिवहन सेवा ९६ कोटी रूपये , आपत्ति निवारण , अग्निशमन ८५ कोटी ६३ लाख रूपये, शासकीय कर परतावा ११६ कोटी ५० लाख रूपये , शिक्षण १५२ कोटी ७३ लाख रूपये, कर्ज परतावा ३८ कोटी १५ लाख रूपये , अतिक्रमण ११ कोटी १२ लाख रूपये आदींचा समावेश आहे.
महापालिकेचे २०२०-२१ आर्थिक वर्षात वाशी सेक्टर १७ ते महात्मा फुले चौक , महात्मा फुले चौक ते कोपरी उड्डाण पूलपर्यंत उन्नत मार्ग घनसोली ते ऐरोली पामबिच मार्ग, अगरोली तलाव ते कोकण भवन येथे उड्डाण पूल बांधण्यात येणार आहेत.नेरुल सेक्टर १९ ए वंडर्स पार्क मधील साडेआठ एकर जमिनीमध्ये सायन्स पार्क बांधण्यात येणार आहे. घनसोली सेक्टर १३ मध्ये अध्यावत असे क्रीड़ा संकुल बांधण्यात येणार आहे.नवी मुंबई शहराच्या हद्दीत प्रवेषद्वृ बड़नयत येणार आहेत. तुर्भे येथे मध्यवर्ती ग्रंथालय बांधण्यात येणार आहे. त्याव्यतिरिक्त मैदाने विकास , तरन्तलाव , पशुवधगृह, शाला इमरती, बायोगैस यूनिट, समाज मंदिर, पार्किंग आदि विविध प्रकल्प अधिक परिणामकारक करण्याचा पालिका प्रशासनाचा मानस आहे.
संजय महाडिक.





