पनवेल, कोकण दर्पण वृत्तसेवा : पनवेल तालुक्यातील खारघर येथील भूमिपुत्र कन्या जान्हवी रामकृष्ण घरत हिला एमबीबीएस पदवी मिळाली आहे. नुकत्याच नेरुळ येथील डॉ डी वाय पाटील विद्यापीठात झालेल्या दिक्षांत सोहळ्यात जान्हवीला सदर पदवी प्रदान करण्यात आली. केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले आणि डॉ डी वाय पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ विजय पाटील यांच्या हस्ते पदवी प्रदान सोहळा संपन्न झाला.
जान्हवी ही खारघर मधील भूमिपुत्र नारायण गोकुळ घरत यांची नात असून शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांची पुतणी आहे. जान्हवीने पुढे एमडी साठी प्रवेश घेण्याचे ठरविले आहे.

भूमिपुत्र कन्या जान्हवी घरत हिला एमबीबीएस पदवी !
More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »
- गणेशोत्सव निमित्त दिल्या जाणाऱ्या टोल माफीचा सरकारला पडला विसर !
- पनवेलमध्ये भरपावसातही तिरंगा पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद; देशभक्तीच्या जयघोषाने शहर दुमदुमले
- समाजप्रिय नेतृत्व आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरातून शुभेच्छांचा वर्षाव विविध समाजोपयोगी उपक्रमांनी वाढदिवस साजरा; जनसेवेची परंपरा कायम
- 5 ऑगस्ट रोजी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील पनवेलमध्ये जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या मुख्य प्रशासकीय कार्यालयासह भव्य ‘मूट कोर्ट’चा उद्घाटन समारंभ




