Press "Enter" to skip to content

” छत्रपती शिवरायांचे रणधुरंधरत्व ” विषयावर खारघर येथे व्याख्यान !

” छत्रपती शिवरायांचे रणधुरंधरत्व ” विषयावर खारघर येथे व्याख्यान !

मराठा समाज खारघरचे आयोजन !

पनवेल, कोकण दर्पण वृत्तसेवा : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने मराठा समाज खारघरच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या मातीचा असलेला शौर्याचा, स्वराज्य निर्मितिचा,शेतकरी कष्टकरी यांच्या स्वावलंबनाचा, स्त्री स्वातंत्र्य आणि रक्षणाचा विचार शिव छत्रपती यांच्या कथानकातून पुढे मांडण्यासाठी शिवजयंती निमित्त मराठा समाज खारघर यांचेवतीने महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध शिवव्याख्याते जयवंत पाटील यांचे जाहिर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे .
खारघर सेक्टर 12 येथील उत्कर्षा हॉल मध्ये 16 फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा वाजता सदर व्याख्यान होणार आहे.

याशिवाय एक सामाजिक भान असलेला उत्सव बनवून आदर्श करण्यासाठी 16 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 ते 2 यावेळेत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे. तरी समस्त खारघर मधील शिवप्रेमी बंधू-भागिनिनी या व्याख्यानास उपस्थित राहण्याचे आवाहन मराठा समाज संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य बी ए पाटील यांनी केले आहे.

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »