पनवेल, कोकण दर्पण वृत्तसेवा : महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रणित नवनिर्माण सेवाभावी संस्था आयोजित कोकण आगरी कोळी महोत्सवात बुधवारी बाल कलाकारांनी आपल्या विविध नृत्याचा आविष्कार केला. विविध नृत्यकला सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली.
कथक, बॉलिवूड, लावणी असे अनेक नृत्य प्रकार बालकलाकारांची सादर केले. या निमित्ताने खारघर शहरातील बालकलाकरांना एक चांगले व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे, अशी प्रतिक्रिया अध्यक्ष प्रसाद परब यांनी कोकण दर्पणशी बोलताना व्यक्त केली.
कोकण दर्पण





