Press "Enter" to skip to content

विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव द्यावा – शाहनवाज खान यांचे प्रतिपादन ! रॉयल स्कूलचे वार्षिक स्नेह संमेलन संपन्न !

विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव द्यावा – शाहनवाज खान यांचे प्रतिपादन !
रॉयल स्कूलचे वार्षिक स्नेह संमेलन संपन्न !

प्रतिनिधी, पनवेल : अभ्यासाबरोबर विद्यार्थ्यांच्या कला गुणांना अधिक वाव देण्याचा प्रयत्न शाळांनी केला पाहिजे, यातूनच विध्यार्थ्याच्या आवडीला व्यासपीठ मिळते,त्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि विद्यार्थ्यांचा यशाकडे जाण्याचा मार्ग सोपा होतो, असे प्रतिपादन एमआयएम विद्यार्थी संघटनेचे कोकण निरीक्षक हाजी शाहनवाज खान यांनी पनवेल येथे केले.

पनवेल तालुक्यातील देवद येथील रोटरीच्या मार्फत सुरु करण्यात आलेल्या रॉयल इंग्लिश मिडीयम स्कुलला चार वर्षे पूर्ण झाली, यानिमित्ताने रविवारी ९ फेब्रुवारी रोजी शाळेचे वार्षिक स्नेह संमेलन उत्साहात पार पडले. यावेळी एमआयएमचे विद्यार्थी संघटनेचे कोकण निरीक्षक हाजी शहानवाज खान यांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले.

यावेळी छोट्या छोट्या विद्यार्थ्यांनी आपले कलाविष्कार सादर केले, यामध्ये वक्तृत्व, अभिनय, नृत्य, गीत गायन आदी कलाविष्कार सादर करून उपस्थित रसिकांची मने जिंकली. यावेळी कार्यक्रमाचे आयोजन सौ. नाझनीन पालेकर यांनी केले होते. यावेळी शाळेच्या सर्व शिक्षकांचे सत्कारही प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी रॉयल इंग्लिश मिडीयम स्कुलचे झाकीर पालेकर, प्रीती नाईक, प्रकाश नाईक, माशूरा मुल्ला, माधुरी जाधव, तनुश्री म्हात्रे, सुहा पालेकर, फारीस पालेकर आदींसह पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

कोकण दर्पण

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »