प्रलंबित बौद्ध विवाह कायदा तातडीने सहमत करावा !
‘दि बुद्धिस्ट पर्सनल लॉ अक्शन कमिटीच्या वतीने” सामाजिक न्यायमंत्र्यांकडे मागणी !
नवी मुंबई, कोकण दर्पण वृत्तसेवा : महाराष्ट्र शासनाकडे दिर्घकाळ प्रलंबित असलेला दि बुद्धिस्ट पर्सनल लॉ अंतर्गत बौद्ध विवाह, घटस्फोट व वारसाहक्क कायदा तातडीने करावा, याबाबत लवकर अमलबजावणी करावी, अशी मागणी दि बुद्धिस्ट पर्सनल लॉ अक्शन कमिटी आॅफ इंडियाचे राष्ट्रीय मुख्य समन्वयक *अॅड. दिलीप काकडे यांनी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे केली आहे. याबाबत लेखी निवेदन देऊन मुंडे यांना विषयाची संपूर्ण माहिती दिली.
दरम्यान, लवकरच या विषयावर आम्ही भूमिका स्पष्ट करुन हा विषय यशस्वी करण्याचे आश्वासन सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी यावेळी दिले. या प्रसंगी अक्शन कमिटीच्या शिष्टमंडळामध्ये नवी मुंबई समन्वयक जयभीम जंगलबाग, तालुका परळी भागातील समन्वयक अशोक प्रधाने, जिवन चौरे, ईश्वर शिंदे, विष्णू प्रधाने, लक्ष्मण गायकवाड यांच्या उपस्थिती होते.
कोकण दर्पण





