Press "Enter" to skip to content

शिवसैनिकांनी खारघर येथे आशिष शेलार यांचा पुतळा जाळून केला निषेध !

पनवेल , कोकण दर्पण वृत्तसेवा : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे साहेब यांना एकेरी भाषेत बोलणारे भाजप नेते आशिष शेलार यांचा मंगळवारी खारघर शिवसेना युवासेना यांच्या कडून निषेध करत प्रतिकात्मक पुतळा जाळण्यात आला. निम पत्ता कडवा है आशिष शेलार है अशा घोषणा देत शिवसैनिकांनी खारघर दणाणून सोडले. आशिष शेलार यांच्या सारख्या मनोरुग्ण प्रवृत्तीचा धिक्कार अशा घोषणा देत शिवसैनिकांनी आपला राग व्यक्त केला .

यावेळी युवासेना राष्ट्रीय सहसचिव पेशदादा पाटील , शिवसेना रायगड जिल्हा उप संघटक परेश भाई पाटील , गुरुनाथ लिलाधर पाटील शिवसेना उपमहानगर संघटक पनवेल , राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष .सतीश पाटील , पनवेल तालुका अध्यक्ष अवजड वाहतूक सेना .रोशन पवार ,
शाखा प्रमुख सचिन ठाकूर , राहूल गायकवाड , गुप्ताजी ,नागोटकर , आणि मोठ्या संख्येने शिवसैनिक युवासैनिक उपस्थित होते.

कोकण दर्पण .

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »