Press "Enter" to skip to content

महाराष्ट्राची परंपरा जपणार्‍या कल्याण फेस्टीव्हलची धूम धडाक्यात सुरुवात !

कल्याण, कोकण दर्पण वृत्तसेवा : डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन आणि अजिंक्य प्रतिष्ठान आयोजित महाराष्ट्राची परंपरा, इतिहास,कला-संस्कृती खाद्यसंस्कृतीत जपणारा हा कल्याणचा फेस्टिवलचे उद्घाटन मंगळवारी कल्याण खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाले.

खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी आपल्या वाढदिवसाच्या दिवशी देखील वेळ काढून कल्याण फेस्टिवल उद्घाटन प्रसंगी उपस्थिती दर्शवून कल्याण फेस्टिव्हलचे उद्घाटन केले त्याचबरोबर कल्याण मधील नागरिकांमध्ये एक मोठा उत्साह दिसून आला, तो म्हणजे आपले लाडके खासदार यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठीचा, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन झाल्यानंतर खडवली येथील आर्मी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी मान्यवरांना गार्ड ऑफ ऑनर देऊन कल्याण फेस्टिवलची खरी सुरुवात झाली, कल्याण फेस्टिव्हलमध्ये आजच्या पहिल्या दिवसाच्या कार्यक्रमात मधुर संगीत यांचा आनंद प्रेक्षकाने लुटला त्याचबरोबर डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक नागरिक उपस्थित राहून त्यांना शुभेच्छा दिल्या, विधानसभा परिषद आमदार अप्पा शिंदे यांनीही या कार्यक्रमात उपस्थिती दर्शवून खासदार श्रीकांत शिंदे यांना शुभेच्छा दिल्या, वाढदिवसानिमित्त आयोजकांनी नाशिक त्रिंबकेश्वर येथील आधारतीर्थ आश्रमातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना बोलावून त्यांना रोख रक्कम 51 हजरा देऊन मदतीचा हात दिला , आणि त्यांच्यासोबत खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी त्याच्या सोबत केक कापून आपला वाढदिवस साजरा केला,त्याचबरोबर अनेक नगरसेवक राजकीय पक्षाचे पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते तसेच बहुसंख्य नागरिक उपस्थित होते, यावेळेस डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी आयोजक नगरसेविका माधुरी प्रशांत काळे यांचे आभार मानले,कल्याण फेस्टिव्हलमध्ये सर्वात मुख्य आकर्षण शस्त्र प्रदर्शन असून गड किल्ल्यांचे छायाचित्रे त्याचबरोबर स्पर्धा परीक्षांमध्ये केलेल्या चित्रकलेचे प्रदर्शन आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं आरमार दिसून आलं, कल्याण फेस्टिवल हा ४ फेब्रुवारीपासून ९ फेब्रुवारी पर्यंत सुरू असून महाराष्ट्रभरातील संपूर्ण संस्कृती तसेच खाद्यसंस्कृतीचा येथे आस्वाद घेता येणार आहे, कल्याण फेस्टिवल २०२० याला जास्तीत जास्त नागरिक आणि उपस्थिती दर्शवावी असे आवाहन आयोजक कल्याण डोंबिवली महानगरपालिका नगरसेविका माधुरी प्रशांत काळे , संयोजक प्रशांत काळे, विजयनगर गवळीनगर फेडरेशनचे अध्यक्ष पि डी चौधरी, अजिंक्य प्रतिष्ठान चे कार्याध्यक्ष साबु चेरियन यांनी केले आहे.

कोकण दर्पण

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »