नवी मुंबई , कोकण दर्पण वृत्तसेवा : नवी महानगरपालिकेतील सीबीडी-बेलापूर प्रभाग क्रमांक १०३ मधील स्थानिक नगरसेविका सुरेखा अशोक नरबागे यांनी आता निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची जोरदार तयारी केली आहे. एप्रिल मध्ये होणाऱ्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत सुरेखा नगबागे उतरणार आहेत. भाजपचे नेते माजी मंत्री तथा आमदार गणेश नाईक यांनी नुकत्याच नवी मुंबईत घेतलेल्या विद्यमान नगरसेवकांच्या बैठकीत स्थानिक नगरसेवकांना प्रथम प्राधान्य देण्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणूकीत सुरेखा अशोक नरबागे यांच्या उमेदवरीचा मार्ग मोकळा झाला आहे.
महापालिकेच्या २०१५ मधील निवडणुकीत नवी मुंबईच्या सभागृहात निवडून गेलेल्या सुरेखा नरबागे आणि सामाजिक नेते अशोक नरबागे यांनी प्रभागात अनेक विकास कामे व सामाजिक उपक्रम राबविले आहेत. महापालिका प्रभाग आरक्षण सोडतीत नगरसेविका सुरेखा नरबागे यांचा प्रभाग क्रमांक १०३ हा खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी राखीव झाला आहे. त्यामुळे सुरेखा नरबागे यांना या प्रभागातून लढणे सोपे जाणार आहे.
कोकण दर्पण.





