“आप” निवडणुकीच्या रणांगणात !
नवी मुंबईत १११ जागा लढविणार !
नवी मुंबई, कोकण दर्पण : नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२० लढण्याच्या तयारीत आम आदमी पार्टी आहे. महापालिकेच्या सर्वच्या सर्व १११ जागांवर आपले उमेदवार उभे करण्याचा निर्धार ‘आप’ने केला आहे. नवी मुंबई विकासच्या मुद्यांवर आम्ही महापालिका निवडणूक लढणार असल्याची माहिती आम आदमी पार्टीचे बेलापूर विधानसभा अध्यक्ष मयुर पंघाळ यांनी कोकण दर्पणशी बोलताना दिली.
नवी मुंबईचा विकास दिशाहीन झाला आहे. झोपडपट्टी पुनर्वसन प्रश्न रखडलेला आहे. प्रस्थापित राजकारण्यांनी नवी मुंबईच्या विकासाच्या नावावर फक्त भ्रष्टाचाराला खतपाणी घातले, असा घणाघात मयुर पंघाळ यांनी यावेळी केला.
कोट –
आप हा एक स्वतंत्र विचारांचा पक्ष आहे. नवी मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीत आम्ही आमचे सक्षम उमेदवार देऊ, आणि नवी मुंबईच्या विकासाला नवी दिशा देऊ, अशी प्रतिक्रिया आपचे ठाणे जिल्हा अध्यक्ष विजय पंजवाणी यांनी कोकण दर्पणशी बोलताना दिली.
कोकण दर्पण.





