पनवेल, कोकण दर्पण वृत्तसेवा : महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रणित नवनिर्माण सेवाभावी संस्थेच्या वतीने खारघर मध्ये भव्य अशा कोकण आगरी-कोळी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. ७ फेब्रुवारी ते १६ फेब्रुवारी दरम्यान खारघर सेक्टर ७ येथील उत्सव चौक मैदानात सदर उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. कोकणातील आगरी-कोळी समाजाच्या संस्कृतीच्या खाणाखुणा जपण्यासाठी या महोत्सवासाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती नवनिर्माण सेवाभावी संस्थेचे कार्याध्यक्ष तथा मनसेचे खारघर शहर अध्यक्ष प्रसाद परब यांनी कोकण दर्पणला दिली.
कोकण आगरी-कोळी महोत्सवादरम्यान सायंकाळी सहा ते रात्री दहा वाजेपर्यत विविध कार्यकरांचे आयोजन करण्यात आले आहे. ७ फेब्रुवारी रोजी मराठी संस्कृतीचा पारंपरिक नजराणा लोकधारा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ८ फेब्रुवारी रोजी अस्सल मराठमोळा घरंदाज लावणी कार्यक्रम रंगला फड लावणीचा रंगणार आहे. ९ फेब्रुवारी रोजी परंपरा आगरी -कोळ्यांची हा लोकगीतांचा कार्यक्रम होणार आहे. १० फेब्रुवारी रोजी महिलांसाठी चला खेळ खेळूया पैठणीचा कार्यक्रम होणार आहे. ११ फेब्रुवारी रोजी मराठमोळा फॅशन शो होणार आहे. १२ फेब्रुवारी रोजी सोलो डान्स तर १३ फेब्रुवारी रोजी ग्रुप डान्सचे आयोजन करण्यात आले आहे. १४ फेब्रुवारी संगीत उत्सव तर १५ फेब्रुवारी रोजी गर्जु लागला महाराष्ट्र या कार्क्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवाचा समारोप हि नजरेला नार या लावणी नृत्याविष्काराने होणार आहे.
कोकण आगरी-कोळी महोत्सवात आयोजित केलेल्या सांस्कृतिक मेजवानी लुटण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
कोकण दर्पण





