Press "Enter" to skip to content

महापालिका कंत्राटी कामगाराच्या पगारातील थकबाकीसाठी ९० कोटी !

नवी मुंबई , कोकण दर्पण वृत्तसेवा : नवी मुंबई महानगरपालिकेतील कंत्राटी कामगारांच्या पगारातील थकबाकीसाठी ९० कोटी रुपये देण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. स्थायी समिती सभापती नवीन गवते यांनी सदर प्रस्तावाला मंजूर देऊन कंत्राटी कामगारांच्या सदर प्रश्नाला मार्ग करून दिला. या निर्णयामुळे नवी मुंबई महापालकेतील विविध विभागात काम करणाऱ्या सुमारे ६, ५०० कंत्राटी कामगारांना लाभ मिळणार आहे.

 नवी मुंबई महानगर पालिकेच्या घनकचरा, मल:निस्सारण, विद्युत, पाणीपुरवठा, उद्यान तसेच आरोग्य यांसारख्या एकूण १७ विभागात कार्यरत असलेल्या ६,५०० कंत्राटी कामगारांच्या १४ महिन्यांच्या थकीत वेतनातील फरक ९० कोटी रुपये कंत्राटी कामगारांना मिळण्याबाबतचा प्रश्न अनेक दिवसांपासून प्रलंबित होता. कामगारांच्या या न्यायहककसाठी अनेक पाठपुरावा आणि आंदोलने झाली. मनसेने देखील याबाबत आक्रमक भूमिका घेत आंनदोलन केले होते.

 सर्व प्रशासकीय बाबी पूर्ण झाल्यानंतर महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी कंत्राटी कामगारांचा प्रस्ताव स्थायी समितीकडे मंजुरीसाठी पाठविला होता . शुक्रवारी झालेल्या  स्थायी समितीबैठकीत हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.  

कोट – कामगारांच्या भावना आम्ही जाणतो. कामगारांच्या न्यायहक्काचे पैसे आम्ही देणारच होतो. याबाबतची प्रशासकीय बाब पूर्ण होणे बाकी होती . सर्वसाधारण सभेने मंजुरी दिल्यानंतर स्थायी समितीने त्याला मंजुरी दिली. कामगारांच्या हककचे पैसे देताना आम्हाला समाधान वाटत आहे
नवीन गवते , सभापती स्थायी समिती .

कोकण दर्पण

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »