Press "Enter" to skip to content

साई गणेश ट्रस्टच्या वतीने माघी गणेशोत्सवाचे आयोजन !

पनवेल, कोकण दर्पण वृत्तसेवा : श्री साई गणेश मंदिर ट्रस्टच्या वतीने खारघर येतेच माघी गणेशोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. पनवेल महापालिकेतील प्रभाग क्रमांक सहाच्या नगरसेविका संजना कदम आणि भाजप युवा नेते समीर कदम यांच्या पुढाकाराने सदर कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
वास्तुविहार येथे २७ व २८ जानेवारी रोजी सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमितताने श्री गणेश पालखी दिंडी सोहळा , समूह नृत्य स्पर्धा , महिलांसाठी हळदी कुंकू आदी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. खारघर सेक्टर १६ येथे आयोजित केलेल्या माघी गणेशोत्सव सोहळ्याला बहुसंख्येने उपस्थित राहावे ,असे आवाहन आयोजक संजना कदम व समीर कदम यांनी केले आहे.

कोकण दर्पण.

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »