माणगावमधील आधुनिक शिक्षणाचे केंद्र “फिनिक्स युनिवर्सल स्कूल “
आधुनिकतेची जोड देऊन विध्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण आणि संस्कार देणारे शिक्षण केंद्र म्हणजे रायगड जिल्ह्यातील नाणोरे- माणगाव मधील “फिनिक्स युनिवर्सल स्कूल ” होय. शाळेतील पाठ्यक्रम पूर्ण करून फक्त हुशार विध्यार्थी घडवायचा नसून भारताचे नेतृत्व करणारी संक्षम आणि जबाबदार पिढी आम्हाला घडवायची आहे, अशी प्रतिक्रिया “फिनिक्स युनिवर्सल स्कूलचे चेअरमन प्रा. किरण गजेवार यांनी व्यक्त केली.
गुरुकृपा रिजनल एज्युकेशन ट्रस्टच्या माध्यमातून खारघर आणि तळोजामध्ये मागील दहा वर्षांपासून शिक्षण क्षेत्रात कार्यरत राहून २०१९ पासून रायगड भूमीत शिक्षण संस्थेने पाय रोवला आहे. रायगड हि छत्रपती शिवाजी महाराज आणि महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांची क्रांतिभूमी आहे. कोकणच्या या मातीने अनेक संगर पाहिलेले आहे. एक मोठा ऐतिहासिक वारसा कोकण आणि रायगडच्या भूमी जपत आहे. रायगडच्या ऐतिहासिक क्रांतिभूमीत शिक्षणाचे केंद्र सुरु करताना आम्हाला आभिमान आणि गौरव वाटत असल्याची भावना प्रा. किरण गजेवार यांनी व्यक्त केली.
माणगाव रेल्वे स्थानकापासून अगदी हाकेच्या अंतरावर मुंबई -गोवा महामार्गावर “फिनिक्स युनिवर्सल स्कूलची भव्य इमारत आहे. २०१९-२० या शैक्षणिक वर्षात संस्थेने इंग्रजी माध्यमाची पूर्व प्राथमिक शाळा सुरु केली.२०२०-२१ या शैक्षणिक वर्षात प्राथमिक विभाग सुरु करण्याचा संस्थेचा मानस आहे. अभ्यासाबरोबर विध्यार्थ्यांना सर्वांगीण शिक्षणाचे धडे दिले जातात. स्वच्छता आणि आरोग्य याचे महत्व विध्यार्थ्यांना सांगितले जाते. खेळातून विद्यार्थ्यांचे स्वास्थ कसे चांगले राहील, हे पहिले जाते.
भविष्यामध्ये संपूर्ण कोकणात शिक्षण केंद्रांचे जाळे निर्माण करण्याचा संस्थेचा विचार आहे. किरण गजेवार हे संस्थेचे चेअरमन असून माजी पोलीस अधिकारी शिवाजी पाटील, शहीद माता सुनीता पाटील, प्रोफेसर जान्हवी साल्पेकर, जेष्ठ हृदयरोग तज्ज्ञ डॉ केशव काळे , जेष्ठ सामाजिक नेते अभिमन्यू पाटील, सामाजिक नेते रामशेठ वाघमारे ,डॉ . अश्विनी गजेवार हे संस्थेचे ट्रस्टी आहेत.






