प्रियदर्शी इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजला प्रा.डॉ.बबन शिनगारे यांची सदिच्छा भेट !
पनवेल, कोकण दर्पण वृत्तसेवा : तक्षशिला सामाजिक संस्था संचलित प्रियदर्शी इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज खेरने, नवी मुंबई या शाळा व जुनिअर कॉलेजला दिनांक १७ जानेवारी रोजी माणगाव येथील द.ग. तटकरे महाविद्यालयातील भूगोल विभाग प्रमुख डॉ बबन शिनगारे यांनी सदिच्छा भेट दिली. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष डॉ. राहुल डोंगरगावकर, सचिव निकिता डोंगरगावकर मॅडम आणि शाळेच्या प्राचार्या अर्पिता लोखंडे यांनी संस्थेच्या व शाळेच्या वतीने त्यांचे स्वागत केले याप्रसंगी डॉ. शिनगारे सर म्हणाले संस्थेने हे लावलेले वृक्ष भविष्यात वटवृक्ष होईल आणि समाजातील सर्व स्तरातील गोरगरीब, गरजू विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्याचे काम करत आहे. भविष्यात नवी मुंबईतील हे एक दर्जेदार शिक्षणाचे केंद्र निर्माण होईल असे याप्रसंगी ते म्हणाले. प्रसंगी संस्थेच्या वतीने शाळेच्या प्रशासकीय अधिकारी पद्मा शानबाग मॅडम यांनी त्यांचे आभार व्यक्त केले.
कोकण दर्पण.





