Press "Enter" to skip to content

दत्तू बनसोडे यांची ट्रान्सपोर्ट व्यवसायात झेप ! जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांनी दिल्या शुभेच्छा !

खारघर, कोकण दर्पण वृत्तसेवा : खारघर येथील सामाजिक कार्यकर्ते दत्तू बनसोडे यांनी ट्रान्सपोर्ट व्यवसायात झेप घेतली आहे. बनसोडे यांनी मोठ्या संघर्षातून सुरु केलेल्या वेथाळेश्वर ट्रान्सपोर्ट टूर्स अँड ट्रॅव्हल्सकंपनीला आता उभारी मिळत आहे. मागील दहा वर्षांपासून सुरू केलेल्या ट्रान्सपोर्ट व्यवसायाला यश आले आहे. कंपनीच्या एका खाजगी प्रवासी बसचे उदघाटन नुकतेच शिवसेनेचे रायगड जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी तालुका संघटक भरत पाटील, उपतालुका संघटक गुरुनाथ पाटील, उपमहानगरप्रमुख दीपक घरत, खारघर शहरप्रमुख शंकर ठाकूर तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांचे दत्तू बनसोडे यांनी स्वागत केले, तर जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांनी बनसोडे यांना शुभेच्छा दिल्या.

कोकण दर्पण.

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »