पंजाबी असोसिएशनच्या वतीने खारघर मध्ये ” लोहरी दि रात“ कार्यक्रम संपन्न !
पनवेल, कोकण दर्पण वृत्तसेवा : पंजाबी कल्चरल अँड वेलफेअर असोसिएशन खारघर यांच्या वतीने ” लोहरी दि रात _ सिझन फोर ” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
आई माता मंदिर ,सेक्टर ५,खारघर येथे सदर कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी पनवेल महानगरपालिका विरोधीपक्ष नेते प्रितम जनार्दन म्हात्रे व ममता प्रितम म्हात्रे यांनी या कार्यक्रमास उपस्थित राहून पंजाबी संस्कृतीने नटलेल्या या बहारदार कार्यक्रमाचा आनंद घेतला.
या वेळी खारघर गुरुद्वारा प्रधान आदरणीय जसविंदर सिंग ,पंजाबी कल्चरल अँड वेलफेअर असोसिएशन खारघर अध्यक्ष विकी अरोरा,उपाध्यक्षा कीर्ती दीदी मेहरा,सचिव रवींद्र सेठिया ,मा.सरपंच खारघर संजय घरत, श्री.विजय पाटील ,रोटरियन विजय गुलाटी, शेखर चालींना सुनील सचदेवा,मिसेस इंडिया इंटरनॅशनल २०१९ -मिसेस सुखविंदर कौर कांग इत्यादी मान्यवर तसेच पंजाबी बंधू-भगिनी मोठ्या प्रमाणात उपस्तित होत्या.
कोकण दर्पण.





