उत्तर रायगड जिल्हा अध्यक्षपदी कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांची बिनविरोध निवड
पनवेल, कोकण दर्पण वृत्तसेवा : कोकणातील संघटनात्मक बांधणीला भाजपने जोमाने सुरुवात केली आहे. याचाच एक भाग म्हणून पक्षाचे रायगड जिल्ह्यात दक्षिण आणि उत्तर असे दोन विभाग तयार करण्यात आले असून, उत्तर रायगड जिल्हा अध्यक्षपदी कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
पनवेल मार्केड यार्ड येथील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात झालेल्या या अध्यक्षपद निवडीच्या बैठकीस निवडणूक निर्णय निरीक्षक तथा माजी आमदार विनय नातू, उरणचे आमदार महेश बालदी, माजी आमदार देवेंद्र साटम, कोकण म्हाडाचे सभापती बाळासाहेब पाटील, जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, शहराध्यक्ष जयंत पगडे, महापौर डॉ. कविता चौतमोल, उपमहापौर जगदिश गायकवाड, उरणच्या नगराध्यक्ष सायली म्हात्रे, जिल्हा सरचिटणीस श्रीनंद पटवर्धन, अविनाश कोळी, चिटणीस दीपक बेहेरे, युवा मोर्चा प्रदेश सचिव विक्रांत पाटील, महिला मोर्चा तालुकाध्यक्ष रत्नप्रभा घरत, नगरसेवक-नगरसेविका, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, विविध सेलचे पदाधिकारी, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी आपल्या मनोगतात पक्षवाढीसाठी सर्वांना सोबत घेऊन यापुढेही काम करेन, असे सांगितले; तर उपस्थितांनी आमदार प्रशांत ठाकूर यांचे अभिनंदन केले आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
कोकण दर्पण





