हेल्मेट सुरक्षा तुमच्यासाठी अन कुटुंबासाठी ! रस्ता सुरक्षा अभियानातील अभिनव उपक्रम !
पनवेल, कोकण दर्पण वृत्तसेवा : नवी मुंबई पोलीस आयुक्तलयाच्या वतीने रस्ता सुरक्षा अभियान २०२० अंतर्गत खारघर येथे आयोजित केलेल्या रस्ता सुरक्षा सप्ताह मध्ये हेल्मेट सुरक्षा तुमच्यासाठी अन तुमच्या कुटुंबासाठी हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला. यावेळी दुचाकीस्वारांमध्ये हेल्मेट वापराबाबत जनजागृती करण्यात आली. मुंबई सायन-पनवेल महामार्गावरील खारघर वाहतूक चौकी ब्रिज खाली सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
खारघर वाहतूक विभाग, नवी मुंबई ,झा ग्रुप खारघर, संकल्प प्रतिष्ठान खारघर व पं. पारसनाथ शर्मा चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या विद्यमाने सुरक्षा सप्ताह अंतर्गत मोफत हेल्मेट वाटप देखील करण्यात आले. मुंबई सायन-पनवेल महामार्ग खारघर वाहतूक चौकी ब्रिज खाली आयोजित करण्यात आला.
आजच्या या अभियानात वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहन चालकांवर पोलिसांनी रीतसर कारवाई करून सुरक्षेचे महत्त्व समजावून मोफत हेल्मेटचे वाटप केले. वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आनंद चव्हाण यांनी रस्ता सुरक्षा सप्ताहाचा उद्देश याविषयी मार्गदर्शन केले. संकल्पचे सचिव अजय माळी यांनी सामाजिक भावनेतून प्रत्येकाचा जीव कसा महत्त्वाचा आहे आणि संस्थेचा मोफत हेल्मेट वाटपाविषयीची संकल्पना स्पष्ट केली.
समाजसेवक दीपक शिंदे यांनी अपघातात मृत्यू पावण्याची संख्या ही नैसर्गिक मृत्यू नंतरची सर्वाधिक आहे.त्यात तरुण मुलांचे प्रमाण जास्त आहे. तरुण देशाचे भविष्य आहे व त्यांना हेल्मेट म्हणजेच जीव का महत्वाचे आहे याविषयीचे मत व्यक्त केले. दिवस रात्र,उन्हा पावसात वाहतूक पोलीस समाजाची सेवा करीत असतात त्यांचे आभार मानण्यात आले.
याप्रसंगी वरिष्ठ पोलीस निरीक्षक आनंद चव्हाण,झा ग्रुप चेअरमन नंदन झा,संकल्प प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष राजेंद्र मांजरेकर (मामा) पं पारसनाथ शर्मा चॅरिटेबल ट्रस्ट अध्यक्ष संतोष शर्मा,संकल्पचे सचिव अजय माळी,समाजसेवक दीपक शिंदे सर,अनिल साबने,युवा कार्यकर्ता,संदीप कासार ,गुरू ठाकूर,दिलीप जाधव,रवींद्र बने,मोना अडवाणी,ऍड.संतोषी चव्हाण,ईश फाउंडेशन च्या कीर्ती मेहरा,चांदणी अवघडे,हंसा पारघी,नितीन केदार,दिव्या मेहरा, पत्रकार गजानन चव्हाण, वैभव गायकर, आप्पासाहेब मगर, संतोष वाव्हळ व वसीमभाई उपस्थिती दर्शीवली.
सरस्वती इंजिनीरिंगचे राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी यांची विशेष उपस्थिती दिसून आली.





