जयश्री चॅरिटेबल ट्रस्टची शिक्षण क्षेत्रात नवी झेप ग्लोबल इंटरनॅशनल स्कूल खारघर !
(संजय महाडिक )
मागील अनेक वर्षांपासून शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेली जयश्री चॅरिटेबल ट्रस्ट शिक्षण क्षेत्रात नवी झेप घेण्यासाठी सज्ज झाली आहे. रायगड जिल्ह्यातील विविध ठिकाणी पूर्व प्राथमिक शाळांचे जाळे निर्माण केल्यानंतर शिक्षणाचे केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खारघर शहरामध्ये इंग्लिश मिडीयम स्कूल अर्थात इंग्रजी माध्यमाची शाळा सुरु केली आहे. खारघर येथे सुरु करण्यात आलेल्या शाळेचे नाव ग्लोबल इंटरनॅशनल स्कूल खारघर असे आहे. येथे पूर्व प्राथमिक ते दहावी पर्यंतचे शिक्षण देण्यात येणार आहे , अशी माहिती जयश्री चॅरिटेबल ट्रस्टचे चेअरमन सुरज नरेश म्हात्रे यांनी दिली.
रायगड म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची क्रांतिभूमी होय. रायगडच्या या भूमीला वेगळा इतिहास आहे. छत्रपती शिवरायांच्या शौर्याने आणि महामानव बाबासाहेबांच्या संगराने कोकणची हि क्रांतिभूमी गौरवशाली बनली. कोकणच्या याच क्रांतिभूमी रायगड मध्ये शिक्षण क्षेत्रात नवा आयाम निर्माण करण्यासाठी रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील पागोटे या क्रांतिकारी भूमीतून एक तरुणतडफदार युवक पुढे आला. समाजाच्या सर्वांगीण विकासाठी शिक्षण महत्वाचे आहे. हा विचार समाजात पेरण्यासाठी त्याने शिक्षण क्षेत्राचा मार्ग स्वीकारला. अर्थात त्या तरुणाचे नाव आहे सुरज म्हात्रे आहे.
उरण तालुक्यातील पागोटे गाव म्हणजे भूमिपुत्रांच्या न्यायहक्कासाठी रक्तरंजित क्रांती घडविलेल्या वीरांची भूमी होय. अर्थातच समाजाच्या सर्वांगीण विकासाठीचे संस्कार त्या मातीने सुरज म्हात्रे यांना दिले आहेत . संस्काराचे तेच देणं सोबत घेऊन सुरज म्हात्रे मागील अनेक वर्षांपासून जयश्री चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत. जयश्री चॅरिटेबल ट्रस्टच्या शैक्षणिक वाटचालीत संस्थेचे संचालक सुशांत म्हात्रे आणि संचालिका कल्याणी म्हात्रे यांचे योगदान देखील महत्वपूर्ण आहे.
२००७ साली शिक्षण क्षेत्रात खऱ्या अर्थाने पाय रोवणाऱ्या सुरज म्हात्रे यांनी जयश्री चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून पनवेल आणि उरण तालुक्यात पूर्व प्राथमिक शाळांची सुरुवात केली. संगणक प्रशिक्षण केंद्रे यशस्वीपणे चालविल्यानंतर कळंबोली, चिरनेर, जासई, खोपोली, उरण , रसायनी येथे पूर्व प्राथमिक शाळांची केंद्र सुरु केली. खारघर सेक्टर १३ मध्ये ग्लोबल एव्हिएशन अकॅडमीच्या माध्यमातून वैमानिक क्षेत्रातील अनेक संध्या नव्या पिढीला उपलब्ध करून दिल्या. वैमानिक क्षेत्रातील पायलट , हवाई सुंदरी सारखे विविध प्रशिक्षण कोर्सबरोबर हॉटेल मॅनेजमेंट, बीबीए, एमबीए सारखे कोर्स भारती विद्यापीठ आणि डॉ डी वाय पाटील युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून देत आहेत.
शिक्षण क्षेत्रातील आता पर्यंतच्या यशस्वी वाटचालीनंतर २०२० या नव्या वर्षात शिक्षण क्षेत्रात नवी झेप घेण्याची तयारी संस्थेने केली आहे. खारघर सेक्टर १३ येथील प्रशस्थ इमारतीत इंग्लिश मिडीयम स्कूल संस्थेने सुरु केले आहे. एज्युकेशन झोन म्हणून नावारूपास आलेल्या खारघर शहराच्या नावलौकिकात ग्लोबल इंटरनॅशनल स्कूल नक्कीच भर टाकेल असा विश्वास संस्थेचे चेअरमन सुरज म्हात्रे यांनी व्यक्त केला आहे. ग्लोबल इंटरनॅशनल स्कूल हि फक्त शाळा नसून नवी सक्षम पिढी घडविण्याचे शिक्षण आणि संस्कार देणारे केंद्र बनवू असा विश्वास सुरज म्हात्रे यांनी यावेळी व्यक्त केला.
कोकण दर्पण .





