Press "Enter" to skip to content

“खारघर विंटर मॅरेथॉन २०२०” एक धाव कॅन्सरमुक्त समाजासाठी !

पनवेल, कोकण दर्पण वृत्तसेवा : व्ही. एस. पी. ग्रुप आणि खारघर जिमखाना स्पोर्ट्स असोसिएशन च्या माध्यमातुन कॅन्सर सारख्या दुर्धर रोगाच्या जनजागृतीसाठी “खारघर विंटर मॅरेथॉन २०२०” चे आयोजन करण्यात आले होते. खारघर सेक्टर २३, गुरुद्वारा समोरील रस्त्यावर आयोजित करण्यात आलेल्या या मॅरेथॉनसाठी जवळपास ३०० स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. या स्पर्धेत ५ किमी आणि १० किमी साठी धावण्याची मुख्य स्पर्धा घेण्यात आली आणि २ किमी ड्रीम रन म्हणुन एक धाव कॅन्सर पीडितांसाठी आणि त्या माध्यमातून जनजागृती व्हावी या उद्देशाने धावण्यासाठी खारघरकरांनी उत्स्फुर्त सहभाग नोंदविला.
या मॅरेथॉनचे मुख्य आयोजक म्हणुन व्ही. एस. पी. ग्रुपचे श्री राम सर आणि खारघर जिमखाना स्पोर्ट्स असोसिएशचे चेअरमन नगरसेवक गुरुनाथ गायकर यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी खारघर जिमखाना स्पोर्ट्स असोसिएशनचे उपाध्यक्ष सुदर्शन नाईक, ट्रस्टी विशाल यादव आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी विशेष मेहनत घेतली.
हि स्पर्धा रायगड ऍथलेटिक असोसिएशनच्या मान्यतेअंतर्गत घेण्यात आली. या मॅरेथॉन साठी विशेष अतिथी म्हणुन डॉ श्रीनिवास , डॉ याशना गुप्ता , डॉ अंजली थडानी, जगीर सिंग , नगरसेवक हरेश केणी , संतोष गायकर , राजेंद्र सोनी , राजीव चौहान अजित सिंग , श्री प्रवीण आदि मान्यवर उपस्थित होते.

५ किमी पुरुष गटात राहुल यादव पहिला , मनजीत सिंग ओबेरॉय दुसरा तर अजय झालते तिसरा आला. ५ किमी महिला गटात संकेत पाटील यांनी पहिला , वासिया लखाडिया यांनी दुसरा तर पार्कावी जैरामा यांनी तिसरा क्रमांक पटकावला. १० किमी पुरुष गटात संकेत ठाकूर याने प्रथम क्रमांक पटकावला. चेतन कडू याने दुसरा तर निरंजन साहू याने तिसरा क्रमांक पटकावला.
१० किमी महिला गटात व्ही. ऐश्वर्या प्रथम आल्या तर स्वाती ठोंबरे द्वितीय तर चित्रा तिवारी यांनी तिसरा क्रमांक पटकावला.

कोकण दर्पण.

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »