पनवेल, कोकण दर्पण वृत्तसेवा : प्रभाग क्रमांक ६ चे उच्चशिक्षित, कार्यसम्राट नगरसेवक ऍड. नरेश ठाकूर व त्यांच्या सहकाऱ्यांच्या विशेष पुढाकाराने न्यू इयर कार्निवल,2020 हा मनाला व शरीराला आनंद देणारा खेळांचा कार्यक्रम या कार्निवलच्या माध्यमातून आयोजित करण्यात आला.
बचपन से पचपन लहानापासून थोरांपर्यंत सर्वांनी कॅरम,खोखो, संगीत-खुर्ची, मटका-फोड ,गाढवाला शेपटी लावणे, भवरा फिरविणे,विटीदांडू, रस्सीखेच, चमचलिंबू,लगोरी, लंगडी, व्हॉलीबॉल, बॉल थ्रो असे विविध खेळ शिवाय झुंबा डान्स व संगीताच्या तालावर नृत्य व व्यायामाचा आनंद सेक्टर १० मधील आबालवृद्धांनी घेतला.
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी राम सोनवणे, रतन भोईर, नाना रणदिवे,निलकुमार शर्मा,मीरा घुगे,रूपा मॅडम, सत्यपालसिंग, नेहा चंद्रा, शैलेंद्र जैन,नूतन त्रिवेदी,अनु मॅडम,अमेय भंगाळे, तुकाराम घोडके, मोहन बिष्ट यांनी विशेष मेहनत घेतली.
या कार्यक्रमाला लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब,आमदार प्रशांतजी ठाकूर यांनी विशेष उपस्थिती दर्शिवली तसेच खारघर शहरातील माजी सभापती नगरसेवक अभिमन्यूशेठ पाटील,नगरसेविका आरती नवघरे, संजना कदम,हर्षदा उपाध्याय, वासुदेव पाटील,समीर कदम,दीपक शिंदे,गीता चौधरी,साधना पवार,संजय मुळीक,अशोक पवार, अनिल साबणे, काशिनाथ पाटील व अनेक सामाजिक संस्थांनी भेट दिली.
कोकण दर्पण.





