Press "Enter" to skip to content

निकिता दाभोलकर मिस खारघर तर संध्या राणी ठरल्या मिसेस खारघरच्या मानकरी !

पनवेल, कोकण दर्पण वृत्तसेवा : खारघर जिमखाना अँड स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीने खारघर महोत्सवादरम्यान घेण्यात आलेल्या खारघर मिस स्पर्धेत निकिता दाभोलकर या विजेत्या ठरल्या तर संध्या राणी यांनी मिसेस खारघरचा किताब पटकावला.
मिस खारघर स्पर्धेत काव्या सैलानी व निकिता म्हात्रे द्वितीय आल्या तर सावनी कोळी यांना बेस्ट कॉस्ट्यूम , कानुप्रिया अरोरा यांना बेस्ट स्माईल तर शिवानी बागल यांना बेस्ट मेकअपचे पारितोषिक मिळाले.
मिसेस खारघर स्पर्धेत मीनाक्षी पाटील व क्रांती फडणीस दुसऱ्या आल्या.मोनिका जैन बेस्ट कॉस्ट्यूम , गीता नागराज बेस्ट स्माईल तर कविता पवार यांना बेस्ट मेकअपचे पारितोषिक मिळाले.

कोकण दर्पण

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »