Press "Enter" to skip to content

नवी मुंबई कला – क्रीडा महोत्सवाचे आयोजन ! आमदार मंदाताई म्हात्रे यांचा पुढाकार !

नवी मुंबई ,कोकण दर्पण वृत्तसेवा : श्री गोवर्धनी सार्वजनिक सेवा संस्थेच्या वतीने आणि सिडकोच्या सहकार्याने सीबीडी – बेलापूर येथे नवी मुंबई कला – क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
बेलापूरच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या पुढाकाराने सदर महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. १८ जानेवारी सायंकाळी सहा वाजता महोत्सवाचे उदघाटन करण्यात येणार आहे.
सीबीडी – बेलापूर सेक्टर १ येथील सुनील गावस्कर मैदानात सदर नवी मुंबई कला – क्रीडा महोत्सव २०२० चे आयोजन करण्यात आले आहे. सदर महोत्सव १८ जानेवारी ते २६ जानेवारी दरम्यान होणार असून यानिमित्ताने विविध सामाजिक, सांस्कृतिक , क्रीडा विषयक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. यादरम्यान चित्रकला स्पर्धा , नृत्य स्पर्धा , समूह नृत्य स्पर्धा खेळ पैठणीचा , पाक कला आदी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. महामानवांना वंदन करणारा देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम महोत्सवात विशेष ठरणार आहे. २६ जानेवारी सकाळी ९ ते २ वाजेपर्यंत मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

कोकण दर्पण.

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »