खारघर, कोकण दर्पण वृत्तसेवा : नववर्षाच्या स्वागतासाठी खारघर सज्ज झाले आहे. ५ जानेवारी २०२० रोजी भव्य अशा ‘न्यू इयर कारनिवल २०२० ‘ चे आयोजन करण्यात आले आहे. पनवेल महापालिकेतील खारघर प्रभाग क्रमांक सहाचे नगरसेवक ऍड नरेश ठाकूर यांच्या पुढाकाराने सदर फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले आहे. खारघर सेक्टर १० मधील सिडको मैदानात सकाळी ७ ते ११ यावेळात हा फेस्टिव्हल होणार असून लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, सभागृह नेते परेश ठाकूर, महापौर डॉ कविता चौतमल आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
न्यू इयर कारनिवल मध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सांस्कृतिक आणि क्रीडा विषयक अनेक स्पर्धा होणार आहेत. योगा, झुंबा, ट्रॅडिशनल डान्सची भरपूर सांस्कृतिक मेजवानी मिळणार आहे. नवीन वर्षाचे स्वागत करताना मागचे वाईट ते विसरून जुन्या चांगल्या आठवणी सोबत घेऊन नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केल्याची माहिती आयोजक नगरसेवक ऍड नरेश ठाकूर यांनी कोकण दर्पणशी बोलताना दिली.
स्वस्त रहा, मस्त रहा, आरोग्यदायी रहा असा संदेश यानिमित्ताने दिला आहे. न्यू इयर कारनिवलमध्ये मोठ्या संख्येने सहभागी राहून उत्सवाचा आनंद लुटा ,असे आवाहन ऍड नरेश ठाकूर यांनी केले आहे.
कोकण दर्पण.





