Press "Enter" to skip to content

खारघरच्या डॉ. अर्चना जानुगडे `झी २४ तास अवॉर्ड` मानकरी !

खारघर, कोकण दर्पण वृत्तसेवा : झी २४ तास वृत्तवाहीनीच्या वतीने खारघर येथील सुप्रसिद्ध आयुर्वेदाचार्या डॉ अर्चना जानुगडे यांना आरोग्य सन्मान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नुकताच मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये हा भव्य कार्यक्रम संपन्न झाला. राज्याचे अर्थ व आरोग्यमंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. यावेळी गृहमंत्री एकनाथ शिंदे, उपसभापती नीलम गोरे , आमदार भाई जगताप आदी मान्यवर उपस्थित होते.

डॉ . अर्चना जानुगडे या गेल्या २२ वर्षांपासून रायगड , नवी मुंबई , मुंबई येथे आयुर्वेद डॉक्टर म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या आदर्शवत कामाची दखल घेत झी २४ तासने त्यांना झी आरोग्य सन्मान देऊन गौरविले . त्यांनी आतापर्यंत २० हजारहून अधिक रुग्णांना यशस्वी उपचार दिले आहेत . रयत शिक्षण संस्थेमध्ये प्राचार्य म्हणून शिक्षणासाठी आयुष्य बहाल करणारे प्राचार्य बी ए पाटील यांच्या त्या कन्या आहेत.

कोकण दर्पण .

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »