Press "Enter" to skip to content

ब्रिजेश पटेल पुन्हा भाजप खारघर शहर अध्यक्ष !

खारघर , कोकण दर्पण वृत्तसेवा : भाजपचे नेते ब्रिजेश पटेल यांची पुन्हा खारघर शहर अध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. मावळते अध्यक्ष म्हणून त्यांची कारकीर्द यशस्वी ठरल्याने लोकनेते रामशेठ ठाकूर आणि आमदार तथा भाजप रायगड जिल्हा अध्यक्ष प्रशांत ठाकूर यांनी ब्रिजेश पटेल यांची पुन्हा नियुक्ती केली आहे.

ब्रिजेश पटेल हे भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. मागील अनेक वर्षांपासून भाजपची ध्येय धोरणे राबवून खारघर शहरात पक्ष वाढीसाठी ब्रिजेश पटेल यांनी मेहनत घेतली आहे. २४ तास उपलब्ध अशी ब्रिजेश यांची ख्याती आहे. ब्रिजेश यांच्या नियुक्तीनंतर लोकनेते रामशेठ ठाकूर आणि आमदार प्रशांत ठाकूर , आमदार महेश बालदि, महापौर कविता चौतमल यांनी शुभेच्छा दिल्या.

कोकण दर्पण.

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »